भारताने दुसऱ्या विजयासह मालिका टाकली खिशात
बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना एजबॅस्टन येथे झाला. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. विजयासाठी १७१ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे इंग्लंचा खेळ १२१ धावांवर आटोपल्याने भारताने ४९ धावांनी सामना जिंकत मालिकेवर कब्जा केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या टी २० संघाने हा सामना जिंकल्यामुळे 'सर्वाधिक सलग विजय' मिळवणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा सर्वात वर आला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्मा व ऋषभ पंत सलामीला आले. या दोघांनी आक्रमक सुरूवात करून पहिल्या पाच षटकात ४९ धावा केल्या. त्यानंतर भारताचा एक-एक खेळाडू बाद होत गेला. पंत व जडेजाने २९ चेंडूंत ४६ धावांची नाबाद खेळी करून टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जडेजाने आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देत नाबाद ४६ धावा करत १७० धावांपर्यंत पोहचवले.
१७१ धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकून फलंदाजी करू शकला नाही. इंग्लंडच्या जेसन रॉयला पहिल्याच चेंडूवर बाद करत भुवनेश्वर कुमारने दमदार सुरूवात करत तीन विकेट घेतल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह व रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्याने इंग्लंडचा संघ १२१ धावा करू शकला. भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेत ४९ धावांनी विजय मिळविला व मालिका खिशात घातली.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
