आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये एकूण ७० सामने खेळवले जाणार असून आजचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे, तर अंतिम सामना २१ मे रोजी होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या कार्यक्रमाची सुरुवात सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने होणार असून सलामीच्या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना आयपीएल १५ व्या हंगामाचा विजेता संघ असलेला गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

गुजरात टायटन्सचं कर्णधारपद हार्दिक पंड्या याच्याकडे आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आहे. घनिष्ठ मैत्री असलेले दोघेही कर्णधार आज एकमेकांच्या विरोधात खेळून आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात करतील.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
पंड्या ब्रदर्सच्या घरी नवा पाहुणा ; हार्दिक काका झाला
एकता दर्शन : पंड्या ब्रदर्सच्या घरी नवा पाहुणा आला असून हार्दिक आता काका झाला आहे. भारतीय क्रिकेटर कृणाल पंड्या बाबा बनला आहे. कृणाल पंड्याने सामाजिक माध्यमाद्वारे आपली पत्नी आणि...
