ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

Share This Article:
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी टीका करत फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या राजेंच्या राजकीय प्रवासाचा शेवट नगरपालिकेची सत्ता गमावून झाला असल्याचे सांगत नगरपालिका निवडणुकीत फलटणकरांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी दि. २५ डिसेंबर रोजी भाजपा-राष्ट्रवादी युतीच्यावतीने फलटण येथील गजानन चौकात आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटण शहराचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, दिलीपसिंह भोसले, प्रल्हादराव साळुंखे पाटील, अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, सौ.मनीषाताई नाईक निंबाळकर, सौ.प्रतिभाताई चेतन शिंदे, श्रीमती मंदाकिनीदेवी हिंदुराव नाईक निंबाळकर, अ‍ॅड.नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, विक्रम आप्पा भोसले, डि.के.पवार आण्णा, रणवीरराजे नाईक निंबाळकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, विलासराव नलवडे, मिलिंद आप्पा नेवसे, अनुप शहा, सुदाम आप्पा मांढरे, अशोकराव जाधव, रामभाऊ ढेकळे, सागर अभंग, उषाताई राऊत, बजरंग नाना गावडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

स्वतःच्या ‘मी’ला महत्त्व देत दुसरे नेतृत्व उभे राहू नये म्हणून प्रयत्न करणारे नेते 

विकासकामांसाठी प्रयत्न करणारे नेते मी पाहिले आहेत; परंतु काही नेते फक्त स्वतःच्या सत्तेसाठी काम करत आहेत. विकास थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. निरा देवघरचे पाणी येऊ नये, नाईकबोमवाडीतील एमआयडीसीची उभारणी होऊ नये, तालुक्यातून जाणारी रेल्वे आणि रुग्णालय यांसारखी कामे पूर्ण होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणारे, या भागातील दुष्काळावर खतपाणी घालणारे नेते मी पहिल्यांदा पाहिले आहेत, असे सांगत विकासापेक्षा स्वतःच्या ‘मी’ला महत्त्व देत, तालुक्यात दुसरे नेतृत्व उभे राहू नये म्हणून षडयंत्र करणारे नेते या तालुक्यात असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.

डॉ.मुंडे प्रकरणाद्वारे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी शोधली

हे कधीही खरे लढवय्ये नव्हते. ते फक्त सत्तेचा उपयोग करून लोकांना बांधून ठेवत, दमबाजी करून त्रास देत सत्तेत राहिलेले होते. ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवसापासून ही माणसे अस्वस्थ झाली आहेत. २५ वर्षे रणजीत दादांनी आणि आम्ही संघर्ष केला आहे. आम्ही सामान्य माणसाच्या विकासाचे काम केले आहे, लोकांचा विश्वास संपादन केला आहे म्हणुनच पालिकेची निवडणूक जिंकली असल्याचे सांगत विधानसभेला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करायचे सोडून डॉ.संपदा मुंडे प्रकरणाद्वारे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी विरोधकांनी शोधली असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.

विकासकामे मार्गी लावण्याची ताकद  रणजीतदादांमध्ये 

फलटण शहराच्या विकासाची जबाबदारी रणजीत दादांनी घेतली आहे. दादांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आहेत. आजपर्यंत जे जे रणजीतसिंह यांनी मागितले आहे, ते फडणवीस यांनी दिले आहे. विकासकामांमध्ये भूमिका कशी घ्यावी आणि पाठपुरावा कसा करावा हे रणजीतसिंह यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. रणजित दादा विकासकामांची फक्त पत्र देत नाहीत तर प्रत्यक्ष काम मार्गी लावण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

तालुक्यात १६ ग्रामपंचायतींची कार्यालये आम्ही दिली

नवीन आमदार निवडून आल्यानंतर कोणत्याही आमदाराला निधी मिळाला नाही, परंतु मी मंत्री झाल्यानंतर दादांनी माझ्या मागे लागून फलटण तालुक्यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला असून फलटण तालुक्यात १६ ग्रामपंचायतींची कार्यालये आम्ही दिली आहेत. जर ही कार्यालये नव्हती, तर सत्ता असताना हे नेते काय करत होते असा प्रश्न गोरे यांनी यावेळी उपस्थित केला.

नादाला लागला तर सोडणार नाही

जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी बुथवर उभे राहून राजकारणामध्ये काम केले आहे. आम्ही शिक्षकांना कल्पना दिली होती की या भानगडीत पडू नका. मी शिक्षकांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, परंतु शासनाचा पगार घेत घर गड्याची कामे करत राहिलात, तर ही दुकानदारी चालणार नसल्याचे सांगत येणार्‍या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत एकही तक्रार आली तर माफी मिळणार नाही, असे सांगत आमच्या नादाला कोण लागला तर त्याला सोडणार नसल्याचा इशारा जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.

२०० कोटींचा निधी देतो पंचायत समितीचा सभापती भाजपाचा करा

निवडणुकीत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे गेलो आणि निवडणूक जिंकली. आता फलटणकरांना विनंती आहे की, आपण लोकसभेला वेळ दिला, विधानसभेला आमदारकी दिली, नगरपालिका दिली आणि नगराध्यक्षही केला. आता मिनी विधानसभा म्हणजेच पंचायत समितीची निवडणूक आहे. येणाऱ्या निवडणुकीत दादांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी ताकदीने उभे रहा. पंचायत समितीचा सभापती भारतीय जनता पक्षाचा करा. सरकारने ५० कोटींचा कोटा दिला असेल तर मी २०० कोटींचा निधी देऊन फलटणमधील प्रत्येक रस्ता दुरुस्त करणार असल्याचे आश्वासन देत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला लागण्याचे आदेश गोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, अनुप शहा, अ‍ॅड.नरसिंह निकम, दिलीपसिंह भोसले, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, सनी काकडे यांची भाषणे झाली.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेळाव्याच्या शेवटी विजयी झालेले सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते करण्यात आला. कुरेशी समाज आणि धुमाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. आभार युवा नेते रणजितसिंह भोसले यांनी मानले 

या आभार मेळाव्यासाठी फलटण शहरातील नागरिक, भाजपा-राष्ट्रवादी युतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...

फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष
फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

एकता दर्शन (फलटण) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपालिका निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी खासदार...