राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गटाचे विश्वासू सहकारी माणिकराव सोनवलकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबई येथे भारतीय जनता पार्टीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीदरम्यान माणिकराव सोनवलकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, भाजप नेते विलासराव नलवडे, पंचायत समिती माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सचिन कांबळे-पाटील, अभिजीत नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव सोनवलकर, सचिन चांगण, उत्तमराव सोनवलकर, लतीफ तांबोळी, मनोज कांबळे-पाटील उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर माणिकराव सोनवलकर म्हणाले, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह यांना विरोध करायला नको होता. राजकीय फायद्यासाठी तालुक्यातील जनतेचे मोठे नुकसान केल्याची खंत तालुक्यातील जनतेला आहे. फलटण तालुक्याचा आमदार भारतीय जनता पार्टी व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विचारांचा करण्यासाठी मी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. राजे गटाचे अनेक कार्यकर्ते नाराज असून आगामी काळात नाराज कार्यकर्त्यांचे प्रवेश भाजपमध्ये होताना दिसतील. माजी खासदार रणजितसिह यांच्या कार्यपद्धतीमुळे आम्ही भारावून गेलो आहे. तालुक्यामध्ये त्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून रणजितसिंह यांच्याकडे फलटण तालुका पाहत आहे. यापुढे तालुक्यात भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जोमाने काम करणार आहे.
याअगोदर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे यांनी राजे गटाला सोडचिट्टी देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
राजकीय क्षेत्रात सोनवलकरांचे प्राबल्य
माणिकराव सोनवलकर हे १९९३ पासून राजे गटाचे निष्ठावंत म्हणून कार्यरत होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, दुधेबावी गावाचे सरपंच अशी मोठी राजकीय पदे त्यांनी राजे गटाच्या माध्यमातून भूषवली आहेत. फलटण तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात माणिकराव सोनवलकर यांचे विशेष प्राबल्य असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा फटका आगामी काळात होणार्या निवडणुकीत राजे गटाला बसण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
