मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी मुंबई येथील त्यांच्या वर्षा निवासस्थानी इतिहासात प्रथमच संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करावा, असे निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत इतिहासात प्रथमच शासकीयस्तरावर संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, राजस्थान या राज्यातील नामदेव भक्त उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संतांनी शांती, समता व बंधुता याचा विश्वाला संदेश देत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करीत सामाजिक ऐक्याचे काम केले आहे. संत नामदेवांचे कार्य महान आहे. त्यांनी भक्ती, प्रेमाच्या जोरावर पंजाब प्रांतात काम केले. पंजाब येथे बांधण्यात येत असलेल्या संत नामदेव महाराष्ट्र भवनसाठी आपण योग्य ते सहकार्य करु.
या सोहळ्यासाठी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, कार्याध्यक्ष राजेंद्र मारणे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, खजिनदार मनोज मांढरे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) श्री नामदेव दरबार कमेटीचे सरबजीत सिंह बावा, सुखजिंदर सिंह बावा, मनजींदर सिंह बावा, नरेंदर सिंह बावा, नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव डॉ.अजय फुटाणे, रोहित येवतकर, ॲड.सागर मांढरे, राजस्थान नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष जसराज सोलंकी, राजेशकुमार गेहेलोत, इंदरमल चौहान, वारकरी समाज संघटनेचे राजाभाउ थोरात, गुजरात छिपा समाज संघटनेचे विजय परमार, हिराचंद नानीवाल यांच्यासह शिंपी समाज बांधव उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
