ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

Share This Article:
फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

एकता दर्शन (फलटण) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपालिका निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिस्पर्धी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा सुमारे ६०० मातांनी पराभव केला असून नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

स्थापनेची सुमारे १५० वर्षे पूर्ण केलेल्या फलटण नगरपालिकेच्या सत्तेत सुमारे ३४ वर्षानंतर सत्ता बदल झाला आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असलेली सत्ता फलटणच्या मतदारांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपविली आहे. फलटणच्या नगराध्यक्षपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून दिले असून २७ नगरसेवक पदाच्या जागांपैकी १८ जागांवर त्यांच्या युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र ॲड.श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असून २७ नगरसेवक पदाच्या जागांपैकी ९ जागा त्यांना मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) विरुद्ध शिवसेना-एकनाथ शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, व कृष्णा भीमा विकास आघाडी अशी लढत झाली होती. या लढतीमध्ये नगरसेवकपदाच्या एकूण २७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ४, भाजप पुरस्कृत अपक्ष २ अशा एकूण १८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना पक्षाने ७, कृष्णा भीमा १, आणि राष्ट्रीय काँग्रेसने १ अशा एकूण ९ जागांवर विजय मिळविला आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत भाजपच्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना १६ हजार ४८९ मते मिळाली आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना १५ हजार ८८९ मते मिळाली आहेत.

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

भारतीय जनता पक्ष :

१) सुलक्षणा जितेंद्र सरगर, २) कांचन दत्तात्रय व्हटकर, ३) रोहित राजेंद्र नागटिळे, ४) किरण देवदास राऊत, ५) श्रीमती मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर, ६) स्वाती राजेंद्र भोसले, ७) कु. सिद्धाली अनुप शहा, ८) अमित अशोक भोईटे, ९) संदीप दौलतराव चोरमले, १०) प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, ११) मोहिनी मंगेश हेंद्रे, १२) रुपाली अमोल सस्ते

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) :

१३) मीना जीवन काकडे, १४) सुपर्णा सनी अहिवळे, १५) सचिन रमेश अहिवळे, १६) राहुल अशोक निंबाळकर

अपक्ष : 

१७) अस्मिता भिमराव लोंढे, १८) सोमा गंगाराम जाधव

शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रीय काँग्रेस, कृष्णा भीमा विकास आघाडीचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

१) रुपाली सुरज जाधव, २) अजरुद्दीन ताजुद्दीन शेख, ३) पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, ४) विशाल उदय तेली, ५) श्वेता किशोर तारळकर, ६) विकास वसंतराव काकडे, ७) स्मिता संगम शहा, ८) पंकज चंद्रकांत पवार (राष्ट्रीय काँग्रेस), ९) कविता श्रीराम मदने (कृष्णा भीमा विकास आघाडी)

नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात 

१९९१ सालापासून विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची फलटण नगरपालिकेवर एकहाती सत्ता कायम होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ही सत्ता बदलली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप-राष्ट्रवादी युतीने निर्णायक विजय मिळवत फलटण नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले आहे. या निकालामुळे फलटण शहराच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाली आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...