इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताला अखेरच्या षटकात ३ चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना कायली मेयर्सने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने षटकार मारून सामना जिंकला. ज्यापद्धतीने तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला तसाच हा दुसरा सामनाही अखेरच्या षटकापर्यंत रंगला. दरम्यान, इंडिजकडून अल्झारी जोसेफ, आणि काइल मेयर्स यांनी भारताचे प्रत्येकी २ गडी बाद केले. तत्पूर्वी इंडिजच्या शाई होपने आपल्या कारकिर्दीतला १०० वा एकदिवसीय सामना खेळताना शतक केले.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल मेयर्स आणि शाई होप हे दोघे सलामीला उतरले. आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देत असतानाच भारतीय गोलंदाज दीपक हुडाने काइल मेयर्सला ३९ धावांवर बाद केले. २२ व्या षटकात अक्षर पटेलने शामराह ब्रुक्सला ३५ धावांवर बाद केले, त्यापाठोपाठ चहलच्या गोलंदाजीवर ब्रॅंडन किंग शून्यावर माघारी परतला. शाई होपने आपल्या कारकिर्दीतला १०० वा एकदिवसीय सामना खेळताना १३ वे शतक केले, त्याला निकोलसची चांगली साथ मिळाली. भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करताना निकोलसने ७४ धावांची खेळी करून भारतासमोर ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले.

फोटो : ICC
विजयासाठी ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. ७९ धावसंख्या असताना भारतचे ३ गडी बाद झाले. श्रेयस अय्यर (६३) आणि संजू सॅमसन (५४) या दोघांनी ९९ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. अक्षर पटेलने उत्कृष्ठ फटकेबाजी करत ३५ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. त्याला आवेशने चांगली साथ दिली. अखेरच्या षटकात ३ चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना कायली मेयर्सने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर अक्षरने षटकार मारल्याने भारताने विजयश्री खेचून आणला आणि २-० अशा आघाडीने मालिकेवर कब्जा केला.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
पंड्या ब्रदर्सच्या घरी नवा पाहुणा ; हार्दिक काका झाला
एकता दर्शन : पंड्या ब्रदर्सच्या घरी नवा पाहुणा आला असून हार्दिक आता काका झाला आहे. भारतीय क्रिकेटर कृणाल पंड्या बाबा बनला आहे. कृणाल पंड्याने सामाजिक माध्यमाद्वारे आपली पत्नी आणि...
