महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर
महाराष्ट्र शासनाकडून शासकीय जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून या संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देत शासनाच्या विशेष मोहीमांच्या जाहिराती ‘अ’ व ‘ब’ वर्गातील वृत्तपत्रांबरोबर ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांनाही देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेवून शासनाकडून ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांना या जाहिरातींचे वितरण सुरु झाले असून लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर करण्यात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाला यश आले आहे.
सदर मागणीच्या पाठपुराव्यासाठी रविंद्र बेडकिहाळ यांच्यासमवेत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सचिव रोहित वाकडे, कार्यकारिणी सदस्य अॅड.रोहित अहिवळे, प्रसन्न रुद्रभटे, दादासाहेब चोरमले, मयुर देशपांडे, प्रशांत अहिवळे आदींनी पाठपुरावा केला होता.
या यशाबद्दल सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, शासनाच्या ‘लाडकी बहीण योजने’सारख्या सर्व योजनांच्या प्रसिद्धीकरणातून जाहिरात यादीवरील ‘क’ वर्ग संवर्गातील वृत्तपत्रांना वगळून शासनाकडून पक्षपातीपणा सुरु होता. छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने होणारा हा अन्याय दूर होण्यासाठी यापूर्वीही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व अन्य सहयोगी संस्थांच्यावतीने शासनास वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा आम्ही दिला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचेही सदर प्रश्नाकडे आम्ही लक्ष वेधले होते. यावर विशेषत: आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तात्काळ महासंचालक ब्रिजेश सिंह यांना दूरध्वनी व पत्राद्वारे सदर प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली होती. तद्नंतर माझ्या नेतृत्त्वात संपादक संघाच्या शिष्टमंडळाने ब्रिजेश सिंह यांची समक्ष भेट घेवून या प्रश्नांसोबत संपादक व पत्रकारांच्या अन्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाकडून दि.६ रोजी ‘मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमा’ची जाहिरात राज्यातील लघु वृत्तपत्रांना वितरित झाली आहे. यामुळे मोठ्या शहरांबरोबरच विशेषत: अगदी छोट्या खेडोपाडी, वाडीवस्त्यांवर वितरित होणार्या छोट्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात मदत होणार आहे.
दरम्यान, लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाकडून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे तसेच उपोषणाच्या मागणीला पाठींबा देणार्या राज्यातील पत्रकार व संपादकांच्या संघटनांचे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
