दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयाने सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या विद्यालयातील दहावीच्या परीक्षेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी कु.राज जयवंत कर्वे ९५.८०%, कु.चैतन्य जगदीश यादव ९३.८०%, कु.आर्यन सचिन वांभुरे ९३.६०%, कु.शिवराज संदीप मुळीक ९३%, कु.रितू गणेश तुपे ९३%, कु.श्रेया आप्पा सोनवलकर ९३%, कु.समीक्षा गणेश माने ९२.६०%, कु.मृण्मयी सुभाष जाधव ९१.८०%, कु.निशांत सचिन रणवरे ९१.६०%, कु.अंतरा शशिकांत ढालपे ९१.४०%, कु.यशराज सतिश जमदाडे ९०.४०%, कु.साईश सतिश फरांदे ९०.२०% या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य अमित सस्ते, महेंद्र कातुरे, ज्ञानेश्वर जाधव, विजय मदने, इरफान शेख, श्रीमती आशादेवी भराडे, सौ.सुजाता गायकवाड, सौ.प्राजक्ता हावळ यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप माने, कोषाध्यक्ष सौ.सविता माने, सचिव विशाल पवार, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ.माधुरी माने, समन्वयिका सौ.सुवर्णा निकम, योगिता सस्ते, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक...
