आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
प्रशालेच्या या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक भिवा जगताप यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयात विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विद्यालयातून प्रथम तीन क्रमांक मिळवण्याचा बहुमान अनुक्रमे कु.सिद्धी प्रीतम काटे ७६.८०टक्के, कु.रेश्मा अनिल राऊत ७० टक्के, कु.सृष्टी विक्रम वाघ ६८ टक्के यांनी मिळवला आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे महत्व लक्षात घेऊन संस्थेचे सचिव व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिवन कार्याचे संशोधक ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सन १९९७ पासून फलटण येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय सुरू केले. पुढे सन १९९९ मध्ये या विद्यालयाला शासन मान्यता व नंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. सुरुवातीपासून अनेक अडचणीमधून या विद्यालयाने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. या विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग हा कष्टकरी व मजूर कुटुंबातील असून परिस्थितीमुळे शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी स्वीकारले आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी अथवा विशेष कोचिंग नसते. प्रशालेच्या गुणवत्तावाढीसाठी संस्थेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांचे मार्गदर्शनही वेळोवेळी मिळत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ, माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष सौ.अलका बेडकिहाळ, प्राथमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष रवींद्र बर्गे, संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, बालवाडी विभाग शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पिसाळ यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
