दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२.८५ टक्के निकाल लागला आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक आनंदराव जाधव 'एकता दर्शन'कडे बोलताना म्हणाले, यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या विद्यालयाच्या चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली असून कु.अंजली अशोक कणसे (९५%) प्रथम क्रमांक, कु.तुष्णा दीपक कुंभार (९३.४०%) द्वितीय क्रमांक, कु.साक्षी महेश नाळे (९२%) या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
फलटण पूर्व भागातील गुणवरे हे गाव सर्वात मोठे आहे. या विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा कष्टकरी व मजूर कुटुंबातील आहे. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व या विद्यालयातील शिक्षक व कर्मचारीवर्गाने स्वीकारले आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी अथवा विशेष कोचिंग नसते. शिक्षकच ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन करत असल्याचे सांगत विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांचे मार्गदर्शनही वेळोवेळी मिळत असल्याचे आनंदराव जाधव यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राहुल कणसे, उपाध्यक्ष बापूराव गावडे, संचालक मारुती चव्हाण, हरिश्चंद्र नाळे, सौ.जयश्री भोसले, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी शिवलाल गावडे, गुणवरे गावचे सरपंच शेखर चव्हाण, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष प्रा.रमेश आढाव यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक...
