भारताचा पहिल्या सामन्यात निसटता विजय
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतने अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजचा ३ धावांनी पराभव करून एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत रोमहर्षक विजय मिळवला.
भारतासाठी प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन आणि शुभनम गिल या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची शतकी भागीदारी करत भारतीय संघाला चांगली सुरवात करून दिली. शिखर, शुभमन आणि श्रेयस या तिघांच्या अर्धशतकामुळे भारत ३०८ धावा करू शकला. दरम्यान विंडीजकडून गुडाकेश मोती, आणि अल्झारी जोसेफ यांनी भारताचे प्रत्येकी २, तर शेफर्ड आणि होसेन या दोघांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले. विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य गाठताना दुखापतीतून सावरलेल्या वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने सर्वाधिक ७५ धावा केल्या.
शुभनम गिलने ३६ चेंडूत त्याचे पहिले एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले, त्यानंतर तो करून ६४ धावांवर बाद झाला. कर्णधारपदाची खेळी खेळताना धवनने ९९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ५७ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची उत्कृष्ठ खेळी खेळली. मधल्या फळीतील खेळाडू चांगली धावसंख्या उभी करतील अशी अपेक्षा होती परंतु सूर्यकुमार १३, व संजू सॅमसन १२ धावा करून बाद झाले. त्यानंतर दीपक हुडा व अक्षर पटेलने भारताची कमान संभाळत हुडाने २७, तर अक्षरने २१ धावा करून इंडीजसामोर ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले.

विजयासाठी ३०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिजची सुरुवात खराब झाली. इंडिजचा शे होप ७ धावा करून बाद झाला. त्यानंतर काइल मेयर्सने शमराह ब्रुक्स सोबत शतकी भागीदारी करत आपल्या संघाला सावरत असतानाच भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने २४ व्या षटकात शमराह ब्रूक्स आणि २६ व्या षटकात मेयर्स या दोन्ही सेट फलंदाजांना बाद करून भारताला सावरण्यासाठी मदत केली.
वेस्ट इंडिजला शेवटच्या १५ षटकात १२० धावा हव्या होत्या त्यावेळी मोहम्मद सिराजने धडाकेबाज निकोलस पूरनला २५ धावांवर बाद केले, तर युझवेंद्र चहलने रोव्हमन पॉवेलला ६ धावांवरच बाद करत या सामान्यातला पहिला बळी घेतला. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी १५ धावांची गरज होती, परंतु सिराजने उत्कृष्ठ गोलंदाजी करत केवळ ११ धावा दिल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. सामान्याच्या शेवटी शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
