इंग्लंडचा संघ ११० धावांवर बाद : भारताचा १० विकेट्सने विजय
ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना ओव्हल येथे झाला. पहिल्याच सामन्यात भारताने १० विकेट्स घेऊन इंग्लंडचा दारुण पराभव केला. बुमराह व शमीच्या साथीने भारतने इंग्लंडला ११० धावांवरच रोखले व ५० षटकात ११० धावांचे टार्गेट घेऊन भारत मैदानात उताराला.
११० धावांचे आव्हान स्वीकारून रोहित शर्मा व शिखर धवन सलामीला आले. रोहितने या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५८ चेंडूत ७८ धाव केल्या, व शिखरने ५४ चेंडूत ३१ धावा करून १९.४ षटकातच भारताला विजय मिळवून दिला. अनेक वर्षांनंतर इंग्लंडच्या विरोधात भारताची सर्वोत्कृष्ठ कामगिरी राहिली.
जसप्रीत बुमराहने या सामन्यात सर्वाधिक गडी बाद करून सामनावीरचा किताब पटकावला. त्याने १९ धावा देत ६ गडी बाद केले, त्यामुळे इंग्लंडचा संघ ११० धावाच करू शकला. कर्णधार रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने भारताला १० विकेट्सने विजय मिळवून देत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
जसप्रीत बुमराह चमकला :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ठ कामगिरी केली. त्याने १९ रन्स देत ६ विकेट्स घेऊन इंग्लंडला अक्षरशः लोळवले. बुमराहला मोहम्मद शमीने साथ देत ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा संघ ११० धावांवरच बाद झाला. सामन्याच्या शेवटी बुमराहला सामनावीरचा किताब देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
