सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणारा वाघर येतोय सिनेरसिकांच्या भेटीला
१२ वर्षांची 'ठकी' नावाची मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी जीवन जगत असताना कोवळ्या वयात 'ठकी'च्या लग्नाची तयारी चालू होते. इच्छा नसतानाही तिच्यावर लग्न करण्याची वेळ येते. कमी वयात लग्नासारख्या अनेक प्रसंगांना तोंड देताना तिच्या आनंदाला जणू काही नजरच लागते.
अशा भावनिक कथा व सामाजिक विषयावर आधारित असलेला ‘राजेंद्र फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत 'वाघर' हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे व दिग्दर्शक भिमराव पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिनेमॅटोग्राफर अमन खान यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान 'वाघर' या चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटात समीक्षा सोनवलकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले व दिग्दर्शन भिमराव पडळकर यांचे आहे. चित्रपटाचे छायाचित्रण मराठी व हिंदी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर अमन खान यांनी केले असून संगीत रवि वव्हाळे व विकी हांडा यांचे आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
एकता दर्शन : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुप्रतीक्षेत असलेला 'इमर्जन्सी' २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा स्वतः कंगनाने चित्रपटाचा टीझर शेअर करत केली. यापूर्वी चित्रपटाच्या...
अभिनेत्री मीरा जोशीचा नृत्यामध्ये दोनदा विश्वविक्रम
एकता दर्शन : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व सुप्रसिद्ध नृत्यांगणा मीरा जोशीने तब्बल १२ तास ट्रेकिंग करीत जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहिब...
मी पुन्हा येईन ; पण यावेळी वेबसीरीजमधून
एकता दर्शन : राज्याच्या राजकारणात गेले अनेक दिवसांपासून ज्या राजकीय घटना घडत आहेत, त्यामधील काही घटनांसोबत जुळणारे संदर्भ असलेली अरविंद जगताप लिखित 'मी पुन्हा येईन' हि वेबसीरीज २९...
मी लोकांसमोर नग्न होऊ शकतो ; बाबा
एकता दर्शन : रणवीर सिंगने एका 'पेपर मॅगझिन'च्या कव्हर पेजसाठी नग्न फोटोशूट करून सामाजिक माध्यमावर खळबळ उडवली आहे. फोटोंमध्ये रणवीर कपड्यांशिवाय दिसत असून अनेकांना ते फोटो आवडले असून...
जॉन अब्राहम आणि मानुषी छिल्लर या कारणासाठी एकत्र येणार
एकता दर्शन : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने ३ जूनला प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटामधून अभिनेता अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा २५...
