मी पुन्हा येईन ; पण यावेळी वेबसीरीजमधून
एकता दर्शन : राज्याच्या राजकारणात गेले अनेक दिवसांपासून ज्या राजकीय घटना घडत आहेत, त्यामधील काही घटनांसोबत जुळणारे संदर्भ असलेली अरविंद जगताप लिखित 'मी पुन्हा येईन' हि वेबसीरीज २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सयाजी शिंदे, सिद्धार्थ जाधव, उपेंद्र लिमये, आणि भारत गणेशपुरे अशा मोठ्या कलाकारांनी या वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
२०१९ च्या निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' हे वाक्य गाजले होते. निवडणूक निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात आली, आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या विधानावर अनेक विनोद झाले होते.
जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते. विश्वासमताच्या दिवसापर्यंत शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. सुरवातीला सुरतला गेलेले आमदार त्यानंतर गुवाहाटीला रवाना झाले. तिथून ते गोव्यात गेले आणि एकनाथ शिंदेंनी भाजप सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधान सभेच्या अधिवेशनासाठी या आमदारांना गोव्याहून थेट मुंबईत आणले होते. विश्वासमत जिंकल्यानंतर विधानसभेत बोलताना स्वतः फडणवीसांनी 'मी पुन्हा येईन' या वाक्याची आठवण करून दिली होती.

'मी पुन्हा येईन' या वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये सत्ता स्थापनेसाठी सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये हे दोन पक्षांचे वेगवेगळे नेते आमदारांची पळवा-पळवी करताना एकमेकांना शह देताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणातील घटनांभोवती असणाऱ्या या वेबसीरीजमधील तगड्या स्टारकास्टने आपल्या विनोदी शैलीने विनोदांची अचूक वेळ साधत अधिक रंगत आणली आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
एकता दर्शन : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुप्रतीक्षेत असलेला 'इमर्जन्सी' २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा स्वतः कंगनाने चित्रपटाचा टीझर शेअर करत केली. यापूर्वी चित्रपटाच्या...
अभिनेत्री मीरा जोशीचा नृत्यामध्ये दोनदा विश्वविक्रम
एकता दर्शन : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व सुप्रसिद्ध नृत्यांगणा मीरा जोशीने तब्बल १२ तास ट्रेकिंग करीत जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहिब...
सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणारा वाघर येतोय सिनेरसिकांच्या भेटीला
१२ वर्षांची 'ठकी' नावाची मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी जीवन जगत असताना कोवळ्या वयात 'ठकी'च्या लग्नाची तयारी चालू होते. इच्छा नसतानाही तिच्यावर लग्न करण्याची वेळ येते. कमी वयात...
मी लोकांसमोर नग्न होऊ शकतो ; बाबा
एकता दर्शन : रणवीर सिंगने एका 'पेपर मॅगझिन'च्या कव्हर पेजसाठी नग्न फोटोशूट करून सामाजिक माध्यमावर खळबळ उडवली आहे. फोटोंमध्ये रणवीर कपड्यांशिवाय दिसत असून अनेकांना ते फोटो आवडले असून...
जॉन अब्राहम आणि मानुषी छिल्लर या कारणासाठी एकत्र येणार
एकता दर्शन : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने ३ जूनला प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटामधून अभिनेता अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा २५...
