अभिनेत्री मीरा जोशीचा नृत्यामध्ये दोनदा विश्वविक्रम
एकता दर्शन : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व सुप्रसिद्ध नृत्यांगणा मीरा जोशीने तब्बल १२ तास ट्रेकिंग करीत जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहिब गुरूद्वारासमोर नृत्य करून आपल्या नावाचा विश्वविक्रम नोंदविला. यापूर्वीही मीराने नृत्यामध्ये असाच विश्वविक्रम रचला होता. त्यामुळे अवघ्या मराठी सिनेसृष्टीत मीराच्या या धाडसाबद्दल कौतुक केले जात आहे.
उत्तराखंड येथील पर्वतरांगांच्या कुशीत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंग यांचे तपश्चर्या स्थान असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "श्री हेमकुंड साहिब गुरूद्वार" बांधण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४६३२ मीटर एवढी त्याची उंची आहे. जवळपास २० किलोमीटरच्या उभ्या चढाईनंतर या हेमकुंड साहिब गुरूद्वारावर पोहचता येते. मीराने तब्बल १२ तास ट्रेकिंग करून या ठिकाणी "एक ओंकार सतनाम" मंत्रावर नृत्य सादरीकरण करून तिने विश्वविक्रम नोंदविला असल्याचे स्पष्ट झाले.
गतवर्षी मीराने जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या महादेव मंदिरासमोर नृत्य सादर करून विश्वविक्रम नोंदविला होता. त्यामुळे सलग दोन वर्षे नृत्य सादरीकरण करून तिने विश्वविक्रम नोंदविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बर्फाच्छादित डोंगर, उणे ३ अंश सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनची कमी असणारी पातळी या पद्धतीची प्रतिकूल व खडतर आव्हाने पार करीत मीराने १२ तासात ट्रेकिंग पूर्ण करून नृत्य केले. त्यामुळे एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन नृत्य करणारी पहिली अभिनेत्री म्हणून मिराकडे पाहिले जात आहे.

मी ज्या दिवशी विश्वविक्रम केला तो दिवस पाऊस आणि थंडीचा होता. वातावरण व कमी ऑक्सिजनमुळे ट्रेक करणे कठीण होते. थंड हवामान आणि सूर्याची किरणे यामुळे माझ्या चेहऱ्याची त्वचा जळाल्यासारखी झाली, ती बरी होण्यासाठी १५ दिवस लागले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि हायरेंजबुक ऑफ वर्ल्डरेकॉर्ड्सची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी माझे ट्रेक लीडर वरुण कवन यांनी मला मदत केली. आनंद बनसोडे व ट्रेकसोबती तुषार सुभेदार यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगसह संपूर्ण ट्रेकमध्ये मदत केली. हा माझा दुसरा विश्वविक्रम आणि तिसरा भारतीय विक्रम आहे. मला या विश्वविक्रमासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिले व मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते.
- अभिनेत्री मीरा जोशी
Sponsored
संबंधित बातम्या
कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
एकता दर्शन : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुप्रतीक्षेत असलेला 'इमर्जन्सी' २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा स्वतः कंगनाने चित्रपटाचा टीझर शेअर करत केली. यापूर्वी चित्रपटाच्या...
सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणारा वाघर येतोय सिनेरसिकांच्या भेटीला
१२ वर्षांची 'ठकी' नावाची मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी जीवन जगत असताना कोवळ्या वयात 'ठकी'च्या लग्नाची तयारी चालू होते. इच्छा नसतानाही तिच्यावर लग्न करण्याची वेळ येते. कमी वयात...
मी पुन्हा येईन ; पण यावेळी वेबसीरीजमधून
एकता दर्शन : राज्याच्या राजकारणात गेले अनेक दिवसांपासून ज्या राजकीय घटना घडत आहेत, त्यामधील काही घटनांसोबत जुळणारे संदर्भ असलेली अरविंद जगताप लिखित 'मी पुन्हा येईन' हि वेबसीरीज २९...
मी लोकांसमोर नग्न होऊ शकतो ; बाबा
एकता दर्शन : रणवीर सिंगने एका 'पेपर मॅगझिन'च्या कव्हर पेजसाठी नग्न फोटोशूट करून सामाजिक माध्यमावर खळबळ उडवली आहे. फोटोंमध्ये रणवीर कपड्यांशिवाय दिसत असून अनेकांना ते फोटो आवडले असून...
जॉन अब्राहम आणि मानुषी छिल्लर या कारणासाठी एकत्र येणार
एकता दर्शन : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने ३ जूनला प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटामधून अभिनेता अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा २५...
