भारताने टॉस जिंकला : आजपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु
भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये आजपासून एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. ओव्हलच्या मैदानावर आज पहिला सामना खेळाला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केनिंग्टन ओव्हल, लंडन : भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये आजपासून एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. ओव्हलच्या मैदानावर आज पहिला सामना खेळाला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून टी-२० मालिका विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंड टी-२० मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याच्या हिशोबाने मैदानात तयार असेल.
दुखापतीमुळे विराट कोहली आजच्या सामन्यात खेळणार नसून प्रसिद्ध कृष्णाला संघाने संधी दिली आहे. तसेच टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ५५ चेंडूत ११७ धावा काढून कमालीचा खेळाला असल्याने त्याच्याकडून आज चांगल्या कामगिरीची अपेक्षा असून सर्वांच्या त्याच्यावर नजरा असतील.
असा असेल भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
