लॉर्ड्सवर अवतरला क्रिकेटचा देव
एकता दर्शन : गुरवार दिनांक १४ जुलै रोजी इंग्लंड आणि भारत यांच्यात लॉर्ड्सवर दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. यावेळी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याचा दिसला.
काल भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. यावेळी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे दोघे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. सामना चालू असताना भारताकडून मोहम्मद शमी सहावे षटक टाकत असताना कॅमेरामनने कॅमेरा प्रेक्षकांच्या गॅलरीवर फिरवला तेव्हा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे दोघे एकत्र दिसून आल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी आवाज करत आनंद व्यक्त केला.
सचिन आणि सौरव हे दोघे लॉर्ड्सवर एकत्र सामन्याचा आनंद घेत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून अनेक दिवसानंतर सचिन व सौरव एकत्र दिसल्यामुळे भारताकडून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या पूर्वीच्या जोडीची आठवण नेटकरी शेअर करत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
