भारताने एकदिवसीय मालिका जिंकली
एकता दर्शन : ऋषभ पंतची नाबाद शतकी खेळी आणि हार्दिकच्या चौफेर फटकेबाजीमुळे भारताने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून इंग्लंडचा पराभव करून एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करत असताना भारताची खराब सुरवात झाली. पहिल्या ५ षटकातच सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन माघारी परतले. रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर शिखर धवन १ वर झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा १७ धावांवर असताना रीस टॉपलीच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यापाठोपाठ कोहली १७ व सूर्यकुमार यादव १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याची चौफेर फटकेबाजी व ऋषभ पंतच्या नाबाद शतकी खेळीने भारताने २६० धावांचे लक्ष्य पार करून मालिका जिंकली. हार्दिक पंड्या ७१ धावांवर बाद झाला आणि ऋषभ पंत १२५ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, युजवेंद्र चहल व हार्दिक पंड्याने इंग्लंडला हादरे दिले. हार्दिकने ७ षटकात २४ धावा देत ४ गडी बाद केले. चहलने ९.५ षटकात ६० धावा देत ३ गडी बाद केले. मोहम्मद सिराजने ९ षटकात ६६ धावा देत जॉनी बेअरस्टो आणि ज्यो रूट या २ खेळाडूंना बाद केले, व तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला २५९ धावांवर रोखले.

फोटो : BCCI
पंतचे एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक.
भारताला मालिकेवर आपले नाव कोरण्यासाठी अखेरचा सामना जिंकणे गरजेचे होते. परंतु सुरवातीलाच भारताचे चारही खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर हार्दिक व ऋषभ या जोडीने भारताचा डाव सावरला. ऋषभने ११३ चेंडूत १६ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १२५ धावा करून एकदिवसीय सामन्यातील त्याचे पाहिले शतक केले. पंतला मोलाची साथ देत हार्दिकने चौफेर फटकेबाजी करून ७१ धावा केल्या. सामन्याच्या शेवटी पंतला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले.
कुंफू पंड्याची चौफेर फटकेबाजी :
आयपीएलमधील कर्णधारपदाच्या प्रयोगापासून हार्दिक आणखीनच परिपक्व होताना दिसत आहे. हार्दिकने आज गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर सुरवातीला हार्दिकने गोलंदाजी करत ७ षटकात २४ धावा देत ४ गडी बाद केले. त्यानंतर मालिका जिंकण्यासाठी चौफेर फटकेबाजी करत १० चौकारांच्या मदतीने ५५ चेंडूत ७१ धावा करून हार्दिकने मालिकावीरचा किताब पटकावला.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
