भारत भिडणार वेस्ट इंडिज सोबत ; आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे
एकता दर्शन : इंग्लंड विरुद्धच्या यशस्वी मालिकेनंतर भारताचा संघ आज वेस्ट इंडिज विरुद्ध पुन्हा मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये आजचा पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आला आहे. या दोघांमध्ये आजपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्याची मालिका मालिका सुरु होत आहे. सुरवातीला एकदिवसीय सामने आणि त्यानंतर ५ टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे.
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, इशान किशन, व संजू सॅमसन यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असून दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांची साथ असणे गरजेचे आहे. गोलंदाजीचा विचार केला तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांचा मालिकेत समावेश असून फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहलवर मदार असेल.

फोटो : BCCI
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
