इंग्लंडकडून भारतचा पराभव : १४६ धावात आटोपला डाव
एकता दर्शन : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर काल दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा १०० धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या रीस टॉपलीने निर्णायक गोलंदाजी करत त्याने ९.५ षटकात २४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. या विजयामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली.
लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. इंग्लंडचा संघ ४९ षटकात २४६ धावांवर बाद झाला. २४७ धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या षटकात, तर शिखर धवन नवव्या षटकात बाद झाला. या दोघांचेही बळी रिसने घेतले. विराट कोहली २५ चेंडूत १६ धावा करुन माघारी परतला.
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने खेळ सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु सूर्यकुमार २७ धावांवर बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या ७३ होती. मैदानावर टिकून खेळणाऱ्या हार्दिक पंड्याला मोइन अलीने बाद करून माघारी पाठवले. पंड्याने ४४ चेंडूत २९ धावा केल्या. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा व शमी बाद झाल्याने भारतचा डाव १४६ धावांवरच आटोपला. इंग्लंडचा गोलंदाज रीस टॉपलीच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज अयशस्वी झाले व रीस टॉपली सामनावीर ठरला.

सुरवातीला कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलने या सामन्यात १० षटकात ४७ धावा देत इंग्लंडचे महत्वाचे ४ चार गाडी बाद करून यशस्वी गोलंदाजी केली. ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराह आपल्या गोलंदाजीमुळे चमकला होता, त्यामुळे लॉर्ड्सवरील दुसऱ्या सामन्यात सर्वांच्या नजरा जसप्रीतवर होत्या परंतु त्याने १० षटकांमध्ये ४९ धावा देत फक्त २ विकेट्स घेतल्या. हार्दिकने ६ षटकांमध्ये २८ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
