ICC पुरुष खेळाडूंची एकदिवसीय क्रमवारी जाहीर ; हार्दिकची ८ व्या स्थानावर झेप
एकता दर्शन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर ICCने बुधवारी पुरुष खेळाडूंची एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. भारताच्या दृष्टीने गोलंदाजी, फलंदाजी, व अष्टपैलू या तिन्ही प्रकारच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल झाले असल्याचे मानले जात असून याचा अनेक नामांकित खेळाडूंना फायदा झाला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत युजवेंद्र चहलने ७ खेळाडू बाद केल्यामुळे युजवेंद्रला गोलंदाजी क्रमवारीत फायदा झाला असून पुरुषांच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत त्याने १६ व्या स्थानावर झेप घेतली आहे. याच एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती दिली होती. बुमराहला त्या विश्रांतीचा फटका चांगलाच महागात पडला असल्याने गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावरून त्याची घसरण झाली असून तो आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. बुमराहने पहिल्या सामन्यात १९ धावा देत ६ खेळाडू बाद करून त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करून त्याने अव्वल स्थान पटकावले होते.
हार्दिक पंड्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत फलंदाजी करताना १०० पेक्षा जास्त धावा केल्या असून गोलंदाजी करताना त्याने ६ खेळाडू बाद केले होते. त्यामुळे एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत ८ स्थानांनी सुधारणा झाल्याने तो आता ४२व्या स्थानावर आला असून अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तब्बल १३ स्थानांनी झेप घेत ८व्या स्थानावर पोहचला आहे.

ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात नाबाद १२५ धावा करून हार्दिकच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला होता. त्याच्या याच वादळी खेळामुळे पुरुष एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत तब्बल २५ स्थानांनी सुधारणा झाल्याने तो आता ५२व्या स्थानावर पोहोचला आहे. या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आजम अव्वलस्थानी असून विराट कोहली ४ व रोहित शर्मा ५व्या स्थानावर आहे.
भारतीय पुरुष खेळाडूंच्या एकदिवसीय क्रमवारीतील बदल खालील प्रमाणे :
- गोलंदाजी क्रमवारीतील बदल :
बुमराहची गोलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने घसरण. ७०३ रेटिंग गुणांसह आता दुसऱ्या स्थानवर,
युझवेंद्र चहल गोलंदाजी क्रमवारीत चार स्थानांनी झेप घेत ६१६ रेटिंग गुणांसह १६व्या स्थानावर.
- फलंदाजी क्रमवारीतील बदल :
हार्दिक पंड्या फलंदाजी क्रमवारीत आठ स्थानांनी झेप घेत ५५२ रेटिंग गुणांसह ४२व्या स्थानावर,
ऋषभ पंत फलंदाजी क्रमवारीत पंचवीस स्थानांनी झेप घेत ५२१ रेटिंग गुणांसह ५२व्या स्थानावर,
विराट कोहली फलंदाजी क्रमवारीत ७९० रेटिंग गुणांसह ४थ्या स्थानावर,
रोहित शर्मा ७८६ रेटिंग गुणांसह ५व्या स्थानावर.
- अष्टपैलू क्रमवारीतील बदल :
हार्दिक पंड्या अष्टपैलू क्रमवारीत तेरा स्थानांनी झेप घेत २४२ रेटिंग गुणांसह ८व्या स्थानावर.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
