अष्टपैलू बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
एकता दर्शन : इंग्लंडचा तारा आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सोमवारी सामाजिक माध्यमावर एक पोस्ट शेअर करत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सोमवार, दि. १८ जुलै रोजी सामाजिक माध्यमावर पोस्ट शेअर करत एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोघांमध्ये आज दि. १९ पासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत असून आफ्रिकेविरुद्ध डरहम येथे खेळला जाणारा आजचा सामना त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीतला अखेरचा सामना असेल.
११ वर्षांचं 'एकदिवसीय क्रिकेट' करिअर :
फलंदाजी आणि गोलंदाजीत माहीर असलेल्या बेन स्टोक्सला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. ४ जून १९९१ मध्ये जन्मलेल्या स्टोक्सने २५ ऑगस्ट २०११ रोजी त्याच्या वयाच्या २० व्या वर्षी आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीला सुरवात केली. स्टोक्सने इंग्लंडकडून आजअखेर १०४ एकदिवसीय सामने खेळले असून गोलंदाजी करताना आतापर्यंत ७४ विकेट्स नावावर केल्या आहेत. फलंदाजी करताना त्याने २९१९ धावा केल्या असून त्यामध्ये ३ शतक व २१ अर्धशतकांचा समावेश आहे. स्टोक्स आज होमग्राउंडवर डरहम येथे आफ्रिकेविरुद्ध त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळून निवृत्त होईल.

निवृत्तीच्या पोस्ट मध्ये काय म्हणाला बेन स्टोक्स :
मी एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधला माझा शेवटचा सामना खेळणार आहे. माझ्यासाठी हा एक कठीण निर्णय आहे. इंग्लंडसाठी खेळत असताना माझा एक अविश्वसनीय प्रवास झाला असून मला माझ्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक मिनिट खेळायला आवडते.
माझ्यासाठी हा निर्णय कठीण असला तरी, मी माझ्या संघसहकाऱ्यांना या फॉरमॅटमध्ये स्वतःचे १००% देऊ शकत नाही. तीन फॉरमॅट्स आता माझ्यासाठी टिकाऊ नाहीत. वेळापत्रक आणि आमच्याकडून काय अपेक्षित आहे या कारणांमुळे माझे शरीर मला निराश करत आहे, परंतु मला असेही वाटते की मी दुसऱ्या खेळाडूची जागा घेत आहे, जो संघाला सर्व काही देऊ शकेल. क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्याची आणि गेल्या ११ वर्षातील अविश्वसनीय आठवणी बनवण्याची हीच वेळ आहे. माझ्याकडे जे काही आहे ते मी कसोटी क्रिकेटसाठी देऊन टी २० फॉरमॅटलाही माझी पूर्ण वचनबद्धता देऊ शकेन.
मी जोस बटलर, मॅथ्यू मॉट, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. मी आतापर्यंत खेळलेले सर्व १०४ खेळ मला आवडले आहेत. इंग्लंडचे चाहते जगातील सर्वोत्तम चाहते असून ते नेहमीच माझ्यासाठी आहेत आणि यापुढेही राहतील. मला आशा आहे की आम्ही मंगळवारी जिंकू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका छान सेट करू. असं स्टोक्सने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
