बूम बूम बुमराह नंबर एकचा गोलंदाज : ट्रेंड बोल्टला टाकले मागे
भारत आणि इंग्लड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहने १९ धावा देत ६ विकेट्स घेऊन त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून ICC ने जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले.
एकता दर्शन : मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी झालेल्या भारत आणि इंग्लड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहने १९ धावा देत ६ विकेट्स घेऊन त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानंतर बुधवारी ICC ने पुरुषांची एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली, त्यामध्ये त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
ट्रेंट बोल्ट आता ICC पुरुषांच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत ७१२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी तिसर्या स्थानावर आला असून त्याचे रेटिंग ६८१ आहे. ICCने जाहीर केलेल्या क्रमवारीत पहिल्या १० गोलंदाजांमध्ये मध्ये जसप्रीत बुमराह हा भारताचा एकमेव खेळाडू असून ७१८ रेटिंग गुणांसह तो पहिल्या क्रमांकावर आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
