फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय एकळ यांनी केले आहे.
जावली (ता.फलटण) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिक विमा योजना जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक एकळ बोलत होते. यावेळी कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर, जावलीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते.
हवामान आधारित पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे बाजरी, कांदा या पिकांची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. काही शेती क्षेत्र नापेर राहिले आहे. शासनाच्या हवामान आधारित पिक विमा योजनेअंतर्गत यावर्षी पेरणी झालेल्या व नापेर क्षेत्राचाही विमा स्वयं घोषणापत्र भरून बँकेत अथवा सीएसएस केंद्रावर एक रुपया भरून ३१ जुलै पर्यंत विमा उतरवला पाहिजे, असे एकळ यांनी यावेळी सांगितले.
कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर म्हणाले, विमा उतरवण्यासाठी सातबारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, विहित नमुन्यातील अर्ज आदी कागदपत्रे महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी विमा फॉर्म व्यवस्थित भरला पाहिजे.
दरम्यान, स्वयंघोषणा पत्राच्या २०० प्रती शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या. शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी जावली व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
तापमान वाढ नियंत्रणावर वृक्ष लागवड प्रभावी उपाय : श्रीमंत रामराजे
एकता दर्शन : वृक्ष लागवड व संवर्धन हे जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण करणारा प्रभावी उपाय आहे. झाडे लावावीत, जगवावीत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवड अभियान व्यापक...
