कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा कार्यालयावर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर मधून मोर्चा काढला. यावेळी महिला, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
फलटण तालुक्यात तडवळे बंगला ते रावडी दरम्यान ४ किलोमीटर अंतर असलेल्या कालव्यातील अस्तरीकरणाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम सिमेंट काँक्रीट मध्ये करण्यात येत असल्यामुळे कालव्यालगत असणाऱ्या विहिरी, कुपनलिका, बोअरवेल बंद पडण्याच्या भीतीमुळे या अस्तरीकरणाच्या कामाला तालुक्यातील काही गावातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठराव करून विरोध केला आहे. यामध्ये तडवळे, सुरवडी, मुरूम, रावडी बुद्रुक, रावडी खुर्द, खामगाव, होळ, डोंबाळवाडी, कुसुर, पाडेगाव, खराडेवाडी, निंभोरे, वडजल, भिलकटी, चौधरवाडी, साखरवाडी, सासवड, वाडेगाव, निंभोरे, तरडगाव, काळज, घाडगेमळा आदी गावांचा समावेश आहे.

मोर्चातील सहभागी गावातील हजारो शेतकरी, महिला व युवकांनी १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टरमध्ये बसून मोर्चाला सुरुवात केली. यावेळी फलटण लोणंद-पालखी मार्गावर ४ किलोमीटर पर्यंत लांब रांग लागली होती. मोर्चा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील चौकात आला यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून 'पायी मोर्चाला' सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चा प्रांत कार्यालयाच्या समोर आला. यावेळी मोर्चातील सहभागी महिला, शेतकरी, युवकांनी 'अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव', 'जल है तो कल है', 'शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चातील सहभागी महिलांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व पाटबंधारे विभागाचे मिलिंद सपकाळ यांच्याकडे निवेदन देत कोणत्याही परिस्थितीत कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम करू नये अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
मोर्चात फलटण तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
तापमान वाढ नियंत्रणावर वृक्ष लागवड प्रभावी उपाय : श्रीमंत रामराजे
एकता दर्शन : वृक्ष लागवड व संवर्धन हे जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण करणारा प्रभावी उपाय आहे. झाडे लावावीत, जगवावीत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवड अभियान व्यापक...
