ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

ध्येयवेडा असामान्य उद्योजक : सचिन यादव

Share This Article:
ध्येयवेडा असामान्य उद्योजक : सचिन यादव

के.बी. एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रा.लि., के.बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा.लि., NEWAGE इनोवेशन्स प्रा.लि., आणि ग्रीन इरा कंपनीचे संचालक सचिन यादव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उद्योग व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यांचा घेतलेला आढावा...

जन्माला आलेला प्रत्येक माणूस जीवन जगत असताना तो आपापल्या पद्धतीने जीवनाची पाने पलटत असतो मात्र फार कमी लोकं असतात त्या पलटलेल्या पानांनाही सोनेरी मुलामा देत इतरांच्या मनावर पलटलेल्या पानांची आदर्शवत सावली ठेवत उमटलेल्या पावलांच्या परिस्पर्शाने प्रत्येकामध्ये नवीन ऊर्जेचा स्रोत निर्माण करत असतात. अशाच एका अद्भुत रसायनाची म्हणजेच के.बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनल प्रा. लि., के.बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा.लि., NEWAGE इनोवेशन्स प्रा.लि., व ग्रीन इरा या कंपनीच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी सक्षमपणे आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या सचिन यादव यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी थेट आपल्यापर्यंत.

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिरवली (ता. बारामती) येथे २४ डिसेंबर १९७७ साली सचिन यादव यांचा जन्म झाला. शेती हा त्यांच्या वडिलांचा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे शेतीसोबत त्यांची लहानपणापासूनच अतूट नाळ जोडली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांची जाणीव त्यांना लहान वयातच होती. बारामती येथील महात्मा गांधी बालक मंदिर येथे प्राथमिक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयात महाविद्यालयीन, फलटण येथील मालोजीराजे शेती विद्यालयात उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुण्यातील कृषी महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर शिक्षणाची घडी बसवत असताना केलेल्या कसरतींच्या जखमा त्यांच्या जीवनातील कार्याची दिशा स्पष्ट करत होत्या. बारामती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेतीसोबत पशुपालनाचा जोडधंदा होता. तेथील प्रमुख हॉटेल व्यावसायिकांना दुधाचा पुरवठा केला जात असल्यामुळे कमी वयातच व्यवसायाचे बाळकडू घरातून मिळाले होते.

शेती करणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे १९९४-९५ दरम्यान पुणे येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे कृषी क्षेत्राशी निगडित असणारे विविध यशस्वी प्रयोग त्यांनी केले. नवनवीन शिकण्याची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. सरांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील ट्रस्ट द्वारे कृषी विज्ञान केंद्रात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात अधिक वाचन केल्यामुळे त्यांना नवीन कल्पना व संकल्पनांची दिशा भेटत गेली. २००८ साली फलटण तालुक्यात के.बी. एक्सपोर्टस इंटरनॅशन नावाच्या कंपनीची उभारणी केली. समोर असलेल्या आव्हानांचा स्वीकार करून शेतकऱ्यांसाठी नवखा विषय असणाऱ्या 'एक्स्पोर्ट'ची माहिती पोहोचवण्यासाठी घड्याळाच्या काट्यांनाही लाजवेल अशा वेगाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत 'एक्स्पोर्ट' या विषयासंदर्भात रेसिड्यू फ्री उत्पादनांची संज्ञा प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये बिंबवत शेतकऱ्यांना उंच भरारीसाठी जणू पंखच दिले.

आपल्या क्षेत्रात कार्य करत असताना खुर्चीला चिकटून राहण्यापेक्षा प्रत्यक्षात जिथे काम चालू असेल त्या ठिकाणी जाऊन अडचणी समजून त्याठिकाणची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक प्रयोग करून दुप्पट क्षमतेने उत्पादन वाढवून कंपनीच्या कमला गती देणे, शेतकऱ्यांच्या व युरोपात माल वाहणाऱ्या वाहनांची तपासणी स्वतः करणे यासह आदी कामांवर बारकाईने लक्ष देऊन आपल्या कामाला न्याय देत असल्यामुळे रेसिड्यू फ्री कृषीमालाची निर्यात युरोपियन बाजारात अव्वल क्रमांकाने सुरु झाली. आज भेंडी, डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी या ताज्या पालेभाज्या व फळांची मोठ्या प्रमाणात असणारी मागणी विश्वासाने ते अवघ्या २४ तासात भारतातून एक्स्पोर्ट करत आहेत. यासह विदेशी फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रुट हे देखील निर्यात केले जात असल्याने एक्स्पोर्ट करणारी भारतातील पहिली निर्यात कंपनी असण्याचा बहुमान प्राप्त झालामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दखल घेऊन कौतुक केले आहे.

युरोपात शेतमाल निर्यात करत असताना घातक कीटकनाशकामुळे अडथळे निर्माण होऊ नयेत व शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी यादव सरानी तज्ञ शास्त्रज्ञांना सोबत घेऊन विविध वनस्पतींच्या अल्कोलॉइड्स पासून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनवणाऱ्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा.लि. कंपनीची स्थापना केली. शेतकऱ्यांना निरोगी व निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन मिळवण्यासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला. यामुळे शेतकऱ्यांसोबत फळं आणि भाजीपाल्याचे सेवन करणाऱ्या नागरिकांना देखील रसायनमुक्त अन्न मिळणे सोपे झाले आहे. या कंपनीमुळे फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर, माण-खटाव, माळशिरस या तालुक्यांसह महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांतील हजारो कुशल-अकुशल कामगारांच्या हाताला काम देण्याच भाग्य सचिन यादव सरांनी  मिळवले आहे.

कमी कालावधीत के.बी. बायोच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेत भारतातील प्रमुख १२ राज्यांमध्ये कंपनीची सुरुवात करत शेतकऱ्यांचे एक विश्वासाचे केंद्र उभा केल्याचा आनंद शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. जलदगतीने सेवा प्रदान करता यावी यासाठी मध्यप्रदेशातील इंदोर येथे कार्यालय सुरु केले आहे. लवकरच अपल्या देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथे कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. निरोगी व सदृढ भारत घडवण्याच्या दृष्टीकोनातून शेतीसंबंधी व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जलदगतीने उपलब्ध राहता यावे, त्यांच्या उद्योगास चालना मिळावी यासाठी NEWAGE इनोवेशन्स प्रा.लि. कंपनीची स्थापना सचिन यादव यांनी केली. रसायनमुक्त उत्पादने प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ताटात पोहोचावीत यासाठी 'ग्रीन इरा' कंपनीची केलेली स्थापना सरांच्या विचारांची सखोलता आमच्या मनामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करते.

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांची सामाजिक जाणीव मावळलेली असल्याची सर्रासपणे आपण पाहतो, मात्र सचिन यादव यांच्याकडे पाहिल्यावर मावळलेल्या सामाजिक जाणिवांचा विचार पूर्णतः बदलून जातो. सरांच्या सामाजिक कार्याच्या प्रेमात पडावे एवढे मोठे कार्य ते करत आपले सामाजिक उत्तरदायित्व जपत आहेत. कोरोना महामारी काळात हजारो गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, धान्य, किराणा याचे वाटप करण्यात केले. कोल्हापूर, सांगली, व कोकण येथील महापुरात अडकलेल्या लोकांना सचिन यादव यांनी कंपनीमार्फत मदतीचा हात दिला. "कंपनी एक कुटुंब" हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेवून अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाला मदतीचा हात देत असतात. जिथे हॉस्पिटलची यंत्रणा प्रयत्न सोडते तिथे सचिन यादव सर हे डॉक्टरांच्या मदतीने स्वतःची यंत्रणा उभी करून अनेक कर्मचाऱ्यांना आरोग्याच्यादृष्टीने मदत करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. लवकरच आयुर्वेदाच्या धर्तीवर विविध वनस्पतींचा वापर करून मानवाच्या जीवनातील आजार व रोगांवर उपचार करण्यासाठी १००X आयुर्वेदा प्रा.लि. कंपनीची स्थापना करणार आहेत. सरांचा हा तेजोमय प्रवास संपूर्ण शेतकरी मानव जातीच्या सेवेसाठी दिवसेंदिवस अधिक वेगाने व्हावा व त्यांचे आरोग्य निरोगी राहावे ह्याच आमच्या सदिच्छा.! सरांचा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!

- हेमंत खलाटे

Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...

भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा

देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...

धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित

गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...

स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर

एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...