धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड आणि टाइम्स ऑफ इंडिया (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार देऊन गौरव केला जातो, याच पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल धीरज आढाव यांना एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.एन.राजे, पोलीस उपायुक्त सौ.स्मार्तना पाटील, माजी मंत्री ज्ञानेश्वर कांबळे, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) उपाध्यक्ष डॉ.मेहबूब सय्यद यांच्यासह माजी सैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

धीरज यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. बारावी डीएड, इंग्लिश व अर्थशास्त्र विषयात पदवी, त्यानंतर मास्टर ऑफ लेबर स्टडीज ही उच्च पदवी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज (मुंबई) येथे प्राप्त केली. सध्या ते खाजगी मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मानव संसाधन विभागात एच.आर.पदावर कार्यरत आहेत.
आपणास मिळालेला पुरस्कार आई, वडील, भाऊ, पत्नी, गुरुजन यांना अर्पित करीत असल्याचे धीरज यांनी सांगितले. धीरज यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...
के.बी.कंपनीची उत्पादने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतील
भारतामध्ये सेंद्रिय शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकरी रसायनमुक्त उत्पादनांच्या खरेदीला पसंती देत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी व...
