साथीच्या आजारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज
एकदा दर्शन, सातारा : पावसाळा व साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असून विविध प्रकारच्या उपयोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद शिर्के यांनी दिली.
डॉ.शिर्के म्हणाले, जिल्ह्यामध्ये एका दिवसात ३८७८ तापाचे रुग्ण व ११०४ अतिसाराचे रुग्ण आढळून आले असल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाले होते, तथापि ही रुग्ण संख्या जून २०२३ ते १२ जुलै २०२३ पर्यंतची असून सन २०२२ मधील रुग्णांच्या आकडेवारीशी तुलना केली असता सदरच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत नाही. सद्यस्थितीच्या वातावरणामधील बदलामुळे रुग्ण आढळून येत आहेत.
साथरोगाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, यामध्ये शासनाच्या सूचनेनुसार दिनांक १ जून ते ३० जून २०२३ दरम्यान हिवताप व साथरोग जनजागरण अभियान राबविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये पाणी उदभवांमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी शुद्धीकरणाबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत असून पिण्याचे पाणी उदभवांची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी गावनिहाय पाठवण्यात आले आहेत. गाव, वाडी वस्तीनिहाय सर्वत्र टीसीएल व मेडीक्लोरचा साठा उपलब्ध करण्यात आला असून ज्या ठिकाणी साठा कमी आहे तिथे ग्रामपंचायतच्या ठिकाणी टीसीएल व मेडीक्लोरचा साठा त्वरित उपलब्ध करून घेणेबाबत सूचना दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्लोरीन टेस्ट किट देण्यात आले असून ओटी सनियंत्रण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथरोगाशी निगडित पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर तातडीचा औषधसाठा तयार करण्यात आला आहे, असे सांगत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व गाव निहाय आशा यांच्याकडे किरकोळ आजाराची औषधे उपलब्ध असल्याची माहिती डॉ.शिर्के यांनी दिली आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे
एकता दर्शन : प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या वर्षा पाटोळे यांनी सातारा जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती...
घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करा ; गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे यांच्या सूचना
एकता दर्शन (गुणवरे ता.फलटण) : तालुक्यातील मंजूर मात्र अपूर्ण असणाऱ्या विविध योजनेतील घरकुलांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी लाभधारकांनी प्रयत्न करावेत अन्यथा पात्र लाभार्थींनी शासनाने...
