सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे
एकता दर्शन : प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या वर्षा पाटोळे यांनी सातारा जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या अगोदर वर्षा पाटोळे सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्यरत होत्या.
नूतन जिल्हा माहिती अधिकारी पाटोळे यांनी यापूर्वी कोल्हापूर, सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्र येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक, मुंबई येथेही वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साथीच्या आजारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज
एकदा दर्शन, सातारा : पावसाळा व साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असून विविध प्रकारच्या उपयोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद...
घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करा ; गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे यांच्या सूचना
एकता दर्शन (गुणवरे ता.फलटण) : तालुक्यातील मंजूर मात्र अपूर्ण असणाऱ्या विविध योजनेतील घरकुलांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी लाभधारकांनी प्रयत्न करावेत अन्यथा पात्र लाभार्थींनी शासनाने...
