के.बी.कंपनीची उत्पादने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतील
भारतामध्ये सेंद्रिय शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकरी रसायनमुक्त उत्पादनांच्या खरेदीला पसंती देत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी व शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यातक्षम उत्पादित करण्यासाठी शेती क्षेत्रातून शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या के.बी.बायो ऑरगॅनिक्स कंपनीची नवी उत्पादने भरगोस उत्पादन देणारी ठरतील असा विश्वास उद्योजक सचिन यादव यांनी व्यक्त केला.
येथील के.बी.एक्स्पोर्ट कंपनीच्या मुख्य कार्यालयात 'न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स' आणि 'नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स' या नवीन दोन उत्पादनांचे लाँचिंग सचिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजस्थान राज्यातील उद्योजक व डीलर्स उपस्थित होते.
सचिन यादव म्हणाले, रेसिड्यू फ्री शेती करत असताना पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कसे घेता घेईल, शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यातक्षम कसा निघेल हा उद्देश समोर ठेवून आम्ही उत्पादनांची निर्मिती करत आहोत. 'न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स' हे उत्पादन जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करून जमिनीचा सामू नियंत्रित करण्याचे कार्य करते. जमिनीतील अन्नद्रव्यांचे बंधन तोडून पिकांची जोमदार वाढ करते. 'नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स' हे उत्पादन पिकाची सर्वांगीण वाढ व विकासासाठी, अधिक फुलधारणेसाठी, फुलांचे रूपांतर फळांमध्ये होण्यासाठी, फुल व फळांची गळती रोखण्यासाठी मार्कर कंपाउंड्सपासून निर्माण केलेले उत्पादन असून ते पिकाची अवस्था व आवश्यकतेनुसार पोषक घटक पुरवून भरघोस उत्पादन देणारे आहे.
दरम्यान राजस्थान मधील उद्योजक व डिलर्सनी प्रात्यक्षिकसह उत्पादनाची माहिती घेत 'न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स' आणि 'नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स' हि उत्पादने शेतमाल उत्पादन वाढीसाठी महत्वपूर्ण ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...
