डॉ. आंबेडकरांच्या कार्यकतृत्वातील विचारांची प्रक्रिया अखंडपणे रहावी : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण फक्त जयंतीदिनी काढणे योग्य नाही. त्यांच्या कार्यकतृत्वातील विचारांची प्रक्रिया अखंडपणे रहावी. यातून नवी पिढी व नवा समाज घडेल. समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोक्यात घेऊन सातत्याने आठवणीत ठेवले पाहिजे. असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले.
फलटण : गुणवरे ता. फलटण येथील ग्रामपंचायतच्या वतीने आयोजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. शशिकला जिजाबा गावडे होत्या. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव गावडे, दुय्यम सहाय्यक निबंधक (सह. संस्था, इंदापूर) जे.पी. गावडे, शिवाजीराव लंगुटे, श्रीरामचे संचालक विठ्ठलराव गौंड, ग्रामसेवक शिवाजीराव भोसले, गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवलाल गावडे, बाळासाहेब गौंड, तुकाराम गावडे, ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण, अंकुश गरगडे, शैलेश गावडे, सौ. सविता आढाव, आधिका गावडे, सुनिता नाळे, धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे, युवराज सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावात विकास आणि समाज घडविणारे राजकारण व्हावे. राजकारण राजकारणाच्या पायरीवरच ठेवावे. गावाच्या एकसंघ ताकदीतूनच गावगाडा चालावा. गावातील स्थानिक स्वराज्य संस्था हि गावाची विकास केंद्रे आहेत. त्यामुळे अशा संस्थात राजकारण नसावे. सहकारी सोसायट्या ह्या शेती, शेतकरी, व सर्वसामान्य सभासदांच्या प्रगतीचा आर्थिक कणा आहे. अशा संस्थाच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. अशी अपेक्षा यावेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी प्राथमिक शाळेतील विधार्थांची डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील भाषणे झाली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बुध्दवंदनेद्वारे अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच प्रा. रमेश आढाव यांनी केले. सुत्रसंचलन दिपक आढाव यांनी केले. कार्यक्रमास प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य, महसुल, कृषी विभागातील आधिकारी, कर्मचारी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्र मास्कमुक्त झाल्यामुळे दक्षता घ्यावी : श्रीमंत शिवरुपराजे
कोरोनाकाळात कोरोना महामारीने संपूर्ण जगालाच फार काही शिकवलं. एकाच गावात घराशेजारी असूनही आपणास एकमेकांना भेटता येत नव्हते. परंतु आता शासनाने मास्कमुक्त महाराष्ट्र केला आहे. सण, उत्सव, समारंभ साजरे करण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे कोरोनाचे दिवस पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये याची दक्षता सर्वांनीच घ्यावी अशी अपेक्षा श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी व्यक्त केली.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
