खासदार रणजितसिहांच्या विकास कामांचा झंझावात
देशाची राजधानी दिल्लीतील संसदेत माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभावी व सक्षम प्रतिनिधित्व करणारे फलटण नगरीचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा आज वाढदिवस या शुभप्रसंगाचे औचित्य साधून त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात गत तीन वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा घेतलेला आढावा...
लोकनेते स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर हे शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात खासदार असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी शिखर शिंगणापूर ते सातारा अशी पदयात्रा काढली होती. स्वतःच्या पक्षाच्या विरोधात पदयात्रा काढणारे ते एकमेव खासदार असावेत. नीरा देवघरचे पाणी आपल्या भागात आणण्यासाठी हिंदुराव नाईक निंबाळकर व त्यांचे सहकारी स्व.बाळासाहेब बागवान यांनी अनेक वर्ष संघर्ष केला.
धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी देऊन योगदान दिले. निरा देवघर धरण प्रकल्प पूर्ण होऊन २० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र गत वीस वर्षांपासून धरणातील आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांनी वापरले. १४ टीएमसीची क्षमता असणाऱ्या व गेली २० वर्षे पूर्ण क्षमतेने भरत असलेल्या धरणासाठी संघर्ष करून ते पाणी खासदारांनी आणले. फलटणच्या प्रस्थापितांनी आघाडी सरकार आल्यावर नीरा देवघरच्या कॅनॉलची कामे तशीच ठेवून, पुन्हा हे आयते पाणी बारामतीला वळवले. त्यांना कायमचे पाणी कसे मिळेल याची व्यवस्था केली. ज्यांचा पाण्यावर हक्क आहे त्यांना कायमचे वंचित ठेवून आघाडी सरकारने मोठे पाप केले.

शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावर माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा-देवघर धरणातील आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा उठाव केला. चोर पावलांनी व चुकीच्या पद्धतीने नेहलेले पाणी लाभक्षेत्रात आणण्यासाठी हजारो कोटींच्या निधीची उपलब्धता करून घेतली त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असताना देखील स्वतःला भगीरथ म्हणणारे स्थानिक नेते तालुक्यात सभा घेऊन रणजितसिंह यांच्यावर व्यक्तिगत टीका करत जनतेत गैरसमज पसरवत आहेत.
इथल्या प्रस्थापितांनी कोरेगाव उत्तर तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेला पाण्याचा शब्द मिळाल्यामुळे जनता त्यांना देव मानत होती, परंतु आजअखेर तेथील जनतेला पाणी मिळाले नाही. खासदार रणजितसिंह यांनी प्रत्यक्ष कृती कृतीतून सर्कलवाडीसह शेजारील गावांना लाभक्षेत्रात आणण्यासाठी कॅबिनेटकडून विशेष निर्णय प्राप्त करून घेतला. प्रस्थापितांनी दिलेले पाण्याचे पोकळ आश्वासन खासदार रणजितसिंह यांनी पूर्ण केले. वसना-वांगणाचे लाभक्षेत्र बदलून येथील भागास पाणी कसे मिळेल याचा निर्णय घेतला, यासाठी सर्वे, अंदाजपत्रक आणि निधी देण्याचे नियोजन शिंदे-फडणवीस सरकारने कॅबिनेटच्या निर्णयानुसार केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरच्या सभेमध्ये नीरा-भीमा स्थिरीकरण व कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पाचा शब्द दिला होता. या दोन्ही प्रकल्पांना राज्यसरकारने हिरवा कंदील दिला असून केंद्राकडून मान्यता मिळवण्यासाठी केंद्रीय जलमंत्री शेखावत यांनी खासदार रणजितसिंह यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. हवाई पाहणीचा दिवस इथल्या भागासह लातूर-बीड व इतर दुष्काळी भागासाठी इतिहासात नोंद करण्यासारखा असून भविष्यातील विकासाचा वेध घेणारा आहे.
लोणंद-फलटण रेल्वेवर प्रस्थापितांनी खासदार रणजितसिंह यांच्यावर वारंवार टीका केली मात्र त्या टीकेला उत्तर प्रत्यक्ष रेल्वे सुरु करून दिले. पुढे लोणंद-फलटण रेल्वे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी पंढरपूर व बारामती पर्यंत विस्तारीकरण करून पूर्ण क्षमतेने सुरु राहण्यासाठी तसेच वडील स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासदारांनी फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे.
फलटणच्या प्रस्थापितांनी ग्रामीण रुग्णालयाचे केवळ राजकारण केले परंतु खासदार रणजितसिंह यांनी इथल्या जनतेसाठी व कै. चिमणराव कदम यांचे झिरपवाडी येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुग्णालयाच्या बांधकामासाठी ६५ कोटींचा निधी प्राप्त करून घेतला. तालुक्यात विद्युत जनित्रे नसल्यामुळे शेतकरी व व्यवसायिकांचे नुकसान होत होते, त्यासाठी १०० केव्हीचे ३०० विद्युत जनित्रे मंजूर करून घेतली. फलटण शहर व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्रीय स्तरावर सतत पाठपुरावा करून केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहरामधील पालखी मार्गावर असणाऱ्या चौकांचे सुशोभीकरणसाठी १०० कोटी मंजूर करून घेतले. नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीसाठी वाढीव क्षेत्राच्या संपादनाचा मार्ग खुला व एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गाला जोडावी म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांनी विशेष/स्परची घोषणा केली.
फलटण तालुक्यासह माढा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची टीम अहोरात्र प्रयत्न करीत आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री शेखावत यांच्यामाध्यमातून कृष्णेचं पाणी निरा-भीमामध्ये कसे आणता येईल याचे नियोजन चालू असून त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पाणी आणण्याची तांत्रिक अडचण विचारात घेऊन सदरचा प्रकल्प नदी-जोड प्रकल्पाच्या माध्यमातून कसा करता येईल, कृष्णेचे जादा होणारे आणि कोल्हापूरपर्यंत पूर परिस्थिती निर्माण करणारे पाणी आपल्या खोऱ्यामध्ये कसे आणता येईल यावर सद्या लक्ष केंद्रित केले असल्याने फलटण तालुक्यासह खंडाळा-माळशिरस व दुष्काळी जिल्ह्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकास करून खऱ्याअर्थाने ऋणमुक्त होण्याचा खासदार रणजितसिंह यांचा मानस आहे. गेली अनेक वर्षात कोणालाही जमलं नाही ते विकासाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस खासदारांनी केले असल्याने फलटण तालुका आणि माढा मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी नक्की राहील.
- जयकुमार शिंदे
भाजपा, सातारा जिल्हा सरचिटणीस
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
