भाजपने आमच्याशी कपट केले
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही भाजपशी युती केली. मात्र, भाजपने आमच्याशी कपट केले. पूर्वीची भाजप चांगली होती. सध्याची भाजप काँग्रेस झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची लढाई सध्या सर्वत्र भाजपबरोबरच राहणार आहे. रासप उमेदवारी देणारा पक्ष आहे उमेदवारी मागणारा पक्ष नाही त्यामुळे रासप देशभरात स्वबळावर लढणार असल्याचे सांगत स्वाभिमानी मतदारांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने येथील अनंत मंगल कार्यालयात माढा लोकसभा मतदारसंघ विजयी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी माजी मंत्री जानकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, भाऊसाहेब वाघ, बबनदादा विरकर, मामुशेठ वीरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती वैशालीताई विरकर, राष्ट्रीय सचिव कुमार सुशील (यु.पी.), माऊली सलगर, डॉ.बी.के.यादव, ॲड.संजय माने, विनायक रुपनवर, सुशील बंडगर, श्रीकांत देवकर, निलेश लांडगे, ऋषिकेश बिचुकले, महादेव कुलाळ, पूजाताई घाडगे, तुकाराम गावडे, प्रताप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
माझा पक्ष गरिबांची झोपडी आहे. या पक्षरुपी झोपडीत सर्व जाती-धर्माचा समावेश असल्याने राष्ट्रीय समाज पक्ष सर्वसमावेशक आहे. दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारीची भीक कधीच मागितली नाही. देशातील १७ राज्यात पक्षाचा विस्तार आहे. अनेक ठिकाणी या पक्षाचे लोक निवडून आले आहेत म्हणूनच लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. मी उमेदवारी मागणारा नेता नाही. उमेदवारी देणारा नेता आहे. रासप ही माझी झोपडी असली तरी हीच राजकीय झोपडी एक दिवस देशाचे नेतृत्व करणार असल्याचा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपने मला विधान परिषदेवर घेतले व मंत्री केले. मात्र आपण एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. पैसे खाल्ले असते तर स्वाभिमानाने आज मी बाहेर फिरू शकलो नसतो. मी फकीर आहे देशभर फिरत असतो. पक्षाचे काम करीत असतो. पक्षाचे कार्यकर्ते मला आर्थिक मदत करीत असल्याचे सांगून माझी लढाई देशाचे नेतृत्व करण्यासाठीची आहे खासदारकीची नाही, असे स्पष्ट करीत ज्या भाजपने आमचे आमदार पळविले त्या भाजपला पुन्हा देशात सत्तेवर बसू देणार नाही. महाराष्ट्रातील परभणी व माढा या दोन लोकसभा मतदारसंघात मी उभा राहणार आहे. परभणीत विजय निश्चित असून माढ्यातही आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.
माढा लोकसभा मतदारसंघात पूर्वी आपण लढलो आहे. या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा स्वाभिमान कधी कुणाकडे घाण टाकला नाही. मी इंजिनियर आहे. मला अनेक भाषा येतात. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी पूर्वी याच सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशाचे नेतृत्व केले. याच जिल्ह्याचा मी सुपुत्र आहे. मला लोकसभा निवडणुकीत मतांचे लीड द्या बाकी मी बघतो. पाण्याच्या प्रश्नावर किती दिवस राजकारण करता असा प्रश्न उपस्थित करीत गोरगरिबांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम आपला पक्ष करेल असा विश्वास व्यक्त करीत अशोक चव्हाण मजबुरीने भाजपात गेले, पूर्वीचा भाजप चांगला होता, आजच्या भाजपची काँग्रेस झाली असल्याचा पुनरुच्चार जानकर यांनी यावेळी केला. लोकसभेत सुप्रिया सुळे चांगल्या बोलतात. मात्र, माढ्यातील खासदारांचे भाषण ऐकायला मिळत नसल्याची टीका खासदारांचे नाव न घेता करीत लोकसभेत बोलण्यासाठी क्वालिटी लागत असल्याचे शेवटी जानकारांनी सांगितले.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी (अहमदनगर), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राष्ट्रीय सचिव कुमार सुशील यांची भाषणे झाली. प्रारंभी तालुका कार्यकारिणी व महिला आघाडीच्यावतीने महादेव जानकर यांचा संविधान प्रस्ताविका व महात्मा फुलेंची मूर्ती देऊन सत्कार केला. माढा विजय निर्धार मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सातारा जिल्हा प्रवक्ता संतोष ठोंबरे यांनी केले. आभार खंडेराव सरक यांनी मानले. मेळाव्यास माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण, कोरेगाव, माण, खटाव, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला या भागातील रासप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
