"शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाचा समारोप
फलटण येथील शुभारंभ कार्यालय परिसरात गेली दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या केंद्र सरकार अंतर्गत "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाचा समारोप केंद्रीय संचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २७ रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शन स्थळी होणार असल्याची माहिती "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाच्या आयोजकांनी दिली आहे.
फलटण : येथील शुभारंभ कार्यालय परिसरात गेली दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या केंद्र सरकार अंतर्गत "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाचा समारोप केंद्रीय संचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २७ रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शन स्थळी होणार असल्याची माहिती "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाच्या आयोजकांनी दिली आहे. याप्रसंगी नूतन भाजप पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार असून भाजप सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून जाधववाडी ता. फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन गेली दोन दिवसांपासून सुरु असून त्याचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, राज्य सरचिटणीस विक्रम पावसकर, फलटण नगरपालिका विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख जिल्हाध्यक्ष सोलापूर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांची भाजपच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी व विक्रम पावसकर यांची राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल, तसेच राज्यात भाजपाचे सर्वात जास्त ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक निवडून आल्याबद्दल सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख या सर्वांचा सत्कार केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...
