ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Tuesday, 19 May 2026

Follow Us:

पांडुरंग हरी ! प्लास्टिक कचरामुक्त पंढरीची वारी !!

Share This Article:
पांडुरंग हरी ! प्लास्टिक कचरामुक्त पंढरीची वारी !!

फलटण : पांडुरंग हरी ! प्लास्टिक कचरामुक्त पंढरीची वारी !! अशा सामाजिक जागृतीच्या उच्चतम ध्येयांनी प्रेरित होऊन पुणे येथील 'थं क्रिएटिव्ह' दक्षता कृती मंच व कमिन्स इंडिया फाउंडेशन गेल्या १३ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभाग घेऊन 'प्लास्टिक व थर्माकोल कचरामुक्त दिंडी' याव्दारे वारी मार्गावर 'प्लास्टिक, थर्माकोल कचरामुक्त अभियान सुरू केले असून आळंदी ते पंढरपूरपर्यंत हि दिंडी कचरामुक्तीचे काम करीत आहे.

प्रस्तृत प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त अभियानातून मानव, शेतीचे, व पर्यायाने पर्यावरण रक्षणातून पृथ्वीचे आरोग्य सदृढ ठेवण्याच्या कामाला या दिंडीने प्राधान्य देऊन प्रत्यक्ष स्वतः कृतीशील उपक्रम राबवित असून याला समाजव्यवस्थेमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे 'थं क्रिएटिव्ह'चे प्रशांत अवचट यांनी 'एकता दर्शन'शी बोलताना सांगितले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात कचरामुक्ती अभियानांतर्गत एकूण ३५० लोकं काम करीत असून त्यांचे तीन गट तयार केले आहेत. या गटांमार्फत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्तीविषयी प्रबोधन, जागृती, कीर्तन, प्रवचन आणि जेवणाच्या पत्रावळीचा वापर याचे मार्गदर्शन केले जात आहे.

कचरा निर्मुलनासाठी आपल्यापासून प्रयत्न करून कचरामुक्तीचे काम करणाऱ्या संस्थांना सीएसआर देणाऱ्या कंपन्यांनी अर्थसहाय्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत आमची संस्था प्रतिवर्षी वारीत पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहे. आगामी तीन वर्षात दोन्ही पालखी मार्ग (ज्ञानेश्वर, संत तुकाराम) कचरामुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. वारकरी, दिंडीप्रमुख, विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन व कृतीशील कार्यक्रम रचना तयार असून ४० ह.भ.प. महाराजांनी या सामाजिक कार्याला पाठिंबा देऊन कचरामुक्ती विषयावर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या तीन वर्षात २ लाख ५० हजार विद्यार्थी व पालकांना प्लास्टिक, थर्माकोल न वापरण्याची शपथ दिली. पान व फुले विकणाऱ्यांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा असे प्रबोधन केले. संस्थेने २ कोटी ५० लाख वापर झालेल्या पत्रावळ्या गोळा करून त्याचे कंपोस्ट खत तयार करून शेतकऱ्यांना त्याचे वाटप केले. पत्रावळ वापरामुळे ४ कोटी लिटर पाण्याची बचत करण्याचे यश या अभियानाव्दारे संस्थेने मिळवले असल्याचे 'थं क्रिएटिव्ह दक्षता कृती मंच'च्या सदस्यांनी सांगितले.

या अभियानात विठ्ठल रूक्मीणी देवस्थान पंढरपूर, आळंदी देवस्थान, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठ, कमिन्स इंडिया फाउंडेशन, पंढरपूर व सासवड नगरपालिका आदी सेवाभावी संस्थाचा सहभाग असून संतानी पर्यावरण रक्षणाचा दिलेला संदेश जनमाणसांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान काम करीत असल्याचे संस्थेचे सदानंद कुलकर्णी, प्रशांत चितळे, राजेंद्र अनारसे, प्रशांत अवचट यांनी सांगितले.

पत्रावळीचा वापर

वारीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत, ते भाविक जेवणासाठी आरोग्यावर परिणाम करणारे थर्माकोल प्लास्टिकचे ताट व द्रोणचा वापर करत आहेत. त्या भाविकांनी प्लास्टिक थर्माकोलचे ताट व द्रोणचा वापरू नये असे आवाहन करून प्लास्टिक थर्माकोलला पर्याय म्हणून भाविकांनी जेवणासाठी झाडांच्या पानांचे द्रोण व पत्रावळ वापरावी अशी जागृती या आभियानाव्दारे आम्ही करीत असल्याचे प्रशांत अवचट यांनी सांगितले. पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी असणाऱ्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कचरामुक्तीचे मार्गदर्शन करून त्यांच्यात जागृती करत असून पत्रावळ झाडांच्या पानांपासून तयार होते, एक पत्रावळ आठ लोकं तयार करतात त्यामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो, पत्रावळीचे विघटन होते, कुजते व त्यापासून तयार होणारे कंपोस्ट खत शेतीला उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी अवचट यांनी सांगितले. 

कचरामुक्त अभियानातून संत विचार

पर्यावरण रक्षणसंबधी संताच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार पालखी सोहळ्यातील भाविकांमध्ये केला जात आहे. मागील ७-८ वर्षात  वारी मार्गावरील प्लास्टिक व थर्माकोल द्रोण जनावरांनी खाल्याने सुमारे ५०० जनावरांचा मृत्यू झाला असल्याचे अवचट यांनी निदर्शनास आणून दिले. प्लास्टिक व थर्माकोलचे विघटन होत नाही, ते कुजत नाही, परिणामी प्राणी व मानवाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, पर्यायाने पर्यावरण व निसर्गावरही प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्‍या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...

डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...

पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...

डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...