सुरवडी ग्रामपंचायत पाटलांच्याच नेतृत्वाखाली राहणार : प्रल्हादराव साळुंखे पाटील
एकता दर्शन (सुरवडी) : गेली पंचवीस वर्षे सुरवडी ग्रामपंचायतीची सत्ता प्रल्हादराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळेच गाव व परिसरामध्ये जात धर्म पंथ विरहित समाजकारण आणि राजकारण करण्याला आपल्याला यश मिळाले. आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवसापर्यंत गावातील कोणतेही काम अपूर्ण राहणार नसल्याची ग्वाही देत विरोधक फक्त निवडणुकांमध्ये पावसाळ्यातल्या छत्र्यांप्रमाणे उगवतात आणि निवडणुका संपल्या कि घरी बसतात. प्रल्हाद पाटील व त्यांचे कुटुंब सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध राहते, त्यामुळे यावेळीही सुरवडी ग्रामपंचायत पाटलांच्याच नेतृत्वाखाली राहील असा विश्वास फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला.
सुरवडी ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचार शुभारंभप्रसंगी आयोजित सभेत प्रल्हादराव साळुंखे-पाटील बोलत होते. यावेळी पाटील पॅनेल सरपंचपदाच्या अधिकृत उमेदवार सौ. शरयू जितेंद्र साळुंखे-पाटील, सदस्यपदाच्या उमेदवार सौ. संगीता बाळासाहेब जगताप, सौ. लीना नितीन जाधव, सौ. सुषमा सतीश नलवडे, सौ. ज्योती नवनाथ जगताप, बापू विठ्ठल माडकर, महेश प्रल्हादराव साळुंखे-पाटील, विजय दादा खवळे, नितीन शिवाजी जाधव, सूर्यकांत भानुदास पवार हे दहा उमेदवार उपस्थित होते.
सत्ताविरहित गाव विकासाचे काम
प्रल्हादराव पाटील पुढे म्हणाले, आपण तालुक्याच्या सत्तेसोबत कधीच राहिलो नाही त्यामुळे सत्तेशिवाय गाव विकासाचे काम आजपर्यंत करत राहिलो. आर्थिक निधीची कमतरता असतानाही गावातील अनेक कामे आपण स्वखर्चाने केली. सध्या केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे आणि खासदार हे भाजपचेच आहेत. त्यांची प्रचंड साथ आपणाला असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करून गाव विकासाची कामे करता येणार आहेत. आगामी काळात सुरवडी गाव एक विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात उभे राहील असा विश्वास साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
जातीय राजकारणाला थारा नाही
गावातील पायाभूत विकासासह गावाचा सामाजिक सलोखा राखण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे व यापुढेही राहील. गावामध्ये विविध जातीधर्मामध्ये समन्वय राखणे व त्यादिशेने काम करणे हा आपला स्थायी स्वभाव आहे. जातीच्या राजकारणाला आपण कधीच थारा दिला नाही गाव हे एक कुटुंब समजून आजअखेर गावाचा सांभाळ करत आलो आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रोत्साहन आणि सहकार्य करण्याचे आद्यकर्तव्य आपण पार पाडले आहे.

हा पाटील मोडेल पण वाकणार नाही
गावातील निवडणूक लागली कि विरोधकांना पुढारपण सुचते. विरोधकांना उमेदवारही मिळत नाहीत. अशी परिस्थिती असताना देखील विरोधासाठी विरोध म्हणून उसना आव आणून कोणत्याही कामाची सामाजिक पार्श्वभूमी नसताना विरोधक नुसती ढवळा-ढवळ करतात. पाटलांकडे कारखाना नाही सत्ता नाही असे वातावरण तालुक्यातील नेत्यांनी आपल्याबाबत तयार केले असले तरी तालुक्यातील भुरट्या पुढाऱ्यांना एवढेच सांगतो कि हा पाटील मोडेल पण वाकणार नाही. मी जिवंत असेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये कुणालाही पाऊल ठेऊ देणार नसल्याचे आव्हान यावेळी साळुंखे-पाटील यांनी विरोधकांना दिले.
कमिन्ससाठी आमचेच प्रयत्न
कारखान्याच्या सत्ताकाळात १५० तरुण कामावर घेतले. कारखान्यातील नव्वद टक्के कामगार हे आपल्याच गावातील आहेत. जागतिक दर्जाची असणारी कमिन्स कंपनी या परिसरात आणण्यासाठी आमचे प्रयत्न राहिले आहेत त्यामुळे या परिसराचा कायापालट होण्यास व सुरवडी गावाचे नाव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यास आमचे महत्वपूर्ण योगदान आहे. खासदार रणजितसिंह हे मला स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या जागी मानतात हि माझ्यासाठी मोठी गोष्ट असून यापुढे खासदारांच्या साथीने स्थानिकांना न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील. गावाच्या विकासाची परंपरा यापुढे कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी ग्रापंपांचायतीची सत्ता पाटील पॅनेलच्या स्वाधीन करावी असे भावनिक आवाहन प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी यावेळी केले.
प्रारंभी धनंजय साळुंखे-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविक भाषणात गावात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी मोहन पवार, गणेश शिंदे, कमलाकर महाराज शिंदे, किसान अप्पा महाराज, बाळू नाना जाधव, दादासाहेब साळुंखे आदींची भाषणे झाली. सूर्यकांत पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. दरम्यान, पाटील पॅनेलच्या सौ. नीता विलास गाडे व सौ. रेखा बाळू गोरे या दोन बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवारांचा मा.पंचायत समिती सदस्या सौ. विमलताई प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
