आदर्शवत व्यक्तिमत्व ; प्रा. रमेश आढाव
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील उपेक्षित वंचित घटकांच्या हाकेला धावून जाणारे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडणारे, वृतपत्र क्षेत्रात आपल्या लेखनशैलीचा स्वतंत्र बाणा जपणारे, अन्याय अत्याचारावर प्रहार करणारे, ग्रामीण विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन करणारे, गुणवरे गावचे सुपूत्र ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव यांचा आज दि. १ ऑगस्ट रोजी वाढदिवस या शुभप्रसंगाचे औचित्य साधून संघर्षाची किनार असणाऱ्या त्यांच्या जीवनातील कार्यकर्तृत्वाचा या लेखाद्वारे घेतलेला आढावा...
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र आपल्या जीवनात आत्मसात करून प्रत्यक्षकृतीत आणण्याच्या प्रयत्नाला प्राधान्य देवुन प्रतिकूल परिस्थीतीशी दोन हात करीत समाजव्यवस्थेत भक्कमपणे पाय ठेवून समाजसेवेचा वसा आपल्या बलशाली खांद्यावर घेऊन गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात शांत संयमाने अभ्यासू चिकित्सवृतीने प्रा. रमेश आढाव फलटण शहर व ग्रामीण भागात आजही कार्यरत आहेत.
सूक्ष्म व चिकित्सक अभ्यासातून अवगत केलेल्या ज्ञानसंपदेचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी करणे हा त्यांचा पाहिल्यापासूनचा स्थायी स्वभाव आहे. यातूनच त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. केवळ तालुकाच नव्हे, तर देशातील विविध राज्यात व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिग्गज अभ्यासू समाजसेवक, राजकारणी, विविध स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क आजही कायम आहे.
सामाजिक चळवळीसोबत पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे काम आदर्शवत असल्याची ढिगभर उदाहरणे सांगता येतील. लोकशाहीतील प्रशासन स्तंभ हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जातो. या प्रशासन क्षेत्रातील उच्च अधिकारी यांच्याशी असणारे सरांचे मित्रत्वाचे नाते उभ्या आयुष्यात निरपेक्ष व निःपक्ष राहिले. सर्व धर्म समभाव या न्यायाने जीवनात वागणे हा त्यांचा अंगभूत गुण अनेकांना विचार करायला लावणारा आहे.
गोरगरीब सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणे हि त्यांच्या कामाची पद्धत आजही पाहायला मिळते. जात धर्म पंथाच्या पलीकडे जावुन अनेकांशी मैत्रीची नाती जोडणारा त्यांचा स्वभाव अद्यापही बदललेला नाही. स्वार्थी भावना न ठेवता ग्रामीण भागात अव्याहतपणे काम करणे हा त्यांचा मूळ उद्देश राहिला आहे. राजकीय नेतृत्वापेक्षा सामाजिक नेतृत्वाचे गुण त्यांच्या अंगी असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर कामगार कष्टकरी वर्गाचे हितकारी प्रश्न घेऊन ते धाडसाने पुढे जातात.
सरांच्या समाजोपयोगी कामांमुळे अनेकदा शासन, प्रशासन, व पत्रकारिता स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली. केंद्रीयमंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांनी भारत सरकारच्या रेल्वे आणि दुरसंचार विभागाच्या सल्लागार समितीवर काम करण्याची संधी दिली होती. विशेषतः रेल्वे समितीमुळे त्यांना अवघा भारत बघता आला. विविध राज्यातील लोकांशी संपर्क करता आला. तो संपर्क त्यांनी आजही टिकवून ठेवला आहे. दुरसंचार समितीच्या माध्यमातून तालुक्यात त्यांना मोठे काम उभे करता आले. तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत दुरध्वनीचे जाळे निर्माण करण्याची संधी त्यांना मिळाली. यातून जिल्हादुरसंचार विभाग, उच्चपदस्थ अधिकारी, व कर्मचारी यांच्याशी घनिष्ठ संबध प्रस्थापित झाले. खासदार श्रीनिवास पाटील, व तत्कालीन खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील हे दोघेही या समितीत होते.
पत्रकारिता क्षेत्रातील अनेक पुरस्कार सरांना मिळाले आहेत. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामामुळे विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देवुन त्यांचा गुणगौरव केला आहे. केंद्र शासनाच्या समित्यांशिवाय राज्य शासनाच्या विविध शासकीय समित्यांवरही काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. सरांनी त्या संधीचा फायदा समाज व्यवस्थेतील घटकांना करुन दिला.
देशातील एक जबाबदार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून काम करणाऱ्या प्रा. रमेश आढाव सरांना वाढदिवासाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
- प्रा. नामदेव बांगर
मराठी विभाग प्रमुख, जनसेवा महाविद्यालय, शेंडी भंडारदरा.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
