निसर्गाचे संवर्धन व संरक्षण अनिवार्य : वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांचे मत
निसर्ग हा माणसाचा सोबती आहे. निसर्ग व मानव यांचे नाते अतूट असल्याने निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करणे अनिवार्य असल्याचे मत विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांनी व्यक्त केले.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन यांच्यावतीने फलटण येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवास्पंदन साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात वाघमोडे बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रवींद्र येवले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, वनपरिक्षेत्र अधिकारी दिगंबर जाधव, ज्येष्ठ कवी प्रदीप कांबळे, सुगम शहा, संमेलनाचे आयोजक ताराचंद आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बदलते पर्यावरण रोखण्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखणी सजग ठेवली पाहिजे. अलीकडे निसर्गामध्ये बदल होत आहेत. पाऊस, थंडी, उन्हाळा केव्हाही जाणवत आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या वयामध्ये मुलांच्यावर संस्कार होत असतात त्याचवेळी अशा मुलांसाठी हे पर्यावरणस्नेही युवास्पंदन साहित्य संमेलन आयोजित करणे ही कृती गौरवाची आहे. जैवविविधता, पर्यावरण, जीवसृष्टी, मानव, वन्यजीव, वृक्षवल्ली, वाढते तापमान, ग्लोबल वार्मिंग याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे असल्याचे सांगत युवा पिढीला या सर्व बाबींची माहिती साहित्य व अन्य स्त्रोत्रांमधून मिळाली पाहिजे असल्याची अपेक्षा वाघमोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
संमेलन अध्यक्ष रवींद्र येवले अध्यक्षीय भाषणात म्हणाले, साहित्य व संस्कृतीबरोबरच पर्यावरण संवर्धन व संरक्षण आजची महत्त्वपूर्ण गरज आहे. साहित्यिकांनी व समाजातील प्रत्येक घटकांनी निसर्गाचा अभ्यास करीत पुढे गेले पाहिजे. विज्ञान शिकायचे नसते तर ते जगायचे असते. साहित्यिकांनी आपली लेखणी सामाजिक प्रश्नांना वाचा फुटेल अशी केली पाहिजे.

प्रदीप कांबळे व आकांक्षा क्लासेसचे जाधव सर यांची यावेळी भाषणे झाली.
प्रारंभी, संमेलनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलनासह वडाच्या रोपाचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटनानंतर "मानव व वन्यजीवन संघर्ष", "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या दोन विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनुक्रमे सचिन जाधव व प्रा.सौ.पुनम मोरे यांनी सहभाग घेतला होता. वरील दोन परिसंवादानंतर राज्यस्तरीय खुले कवी संमेलन आयोजित केले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आनंदा ननवरे होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव व सौ.सुलेखा शिंदे उपस्थित होते. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन राहुल निकम यांनी केले.
संमेलन समारोप महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकीहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, अश्विनी मडगे, रामचंद्र इकारे, वृषाली टाकळे, हरिश्चंद्र पाटील, लक्ष्मण मोहिते, बाळकृष्ण बाचल, अजित जाधव, प्रा.अनंता सूर यांचा गौरव करण्यात आला.
संमेलनाचे प्रास्ताविक संमेलन स्वागताध्यक्ष सुगम शहा यांनी केले. संमेलनाची भूमिका संमेलन संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद आवळे यांनी स्पष्ट केली. आभार राहुल निकम यांनी मानले. या एकदिवसीय राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवस्पंदन साहित्य संमेलनास राज्यातील विविध भागातून लेखक, कवी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
