ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

पर्यटन वाढीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : श्रीमंत संजीवराजे

Share This Article:
पर्यटन वाढीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : श्रीमंत संजीवराजे

एकता दर्शन, फलटण : ‘‘मोठ्या उद्योगांना सहकार्य करणारे छोटे उद्योग फलटणमधील तरुणांनी उभे करावेत’’, अशी अपेक्षा व्यक्त करून ‘‘फलटणमध्ये पर्यटन वाढीलाही मोठा वाव आहे; त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा’’, असे आवाहन ‘गोविंद मिल्क’चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फलटण तालुका संस्कृती महोत्सवातील ‘फलटणची उद्योग भरारी’ या परिसंवादात श्रीमंत संजीवराजे बोलत होते. व्यासपीठावर परिसंवादातील सहभागी उद्योजक निंबकर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ.अनिल राजवंशी, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, के.बी.एक्सपोर्ट प्रा.लि; चे संचालक सचिन यादव, परिसंवादाचे संवादक प्रा.सतिश जंगम उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, ‘‘उद्योग व्यवसायामध्ये तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे असून फलटणमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उद्योग क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसाय उभारताना येणार्‍या अडचणी सोडवून प्रामाणिकपणे, चिकाटीने सर्व सहभागी घटकांना बरोबर घेऊन उद्योग व्यवसाय केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो.’’

पद्मश्री अनिल राजवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना, ‘‘आपल्या परिसरामध्ये असलेल्या समस्या शोधून त्या कशा सोडवता येतील याबाबतचा विचार केल्यास आपल्याही मनात संशोधनवृत्ती निर्माण होईल. तरुणांनी पैशाच्या मागे न लागता मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञान मिळाले तर आपोआपच पैसे मिळत राहतील’’, असे सांगितले.

‘‘सहकारामध्ये प्रामाणिकपणे व सचोटीने काम केल्यास संस्थेबरोबरच समाजाचे हित साधता येते. त्यातूनच आज आपण जवळजवळ १५ सहकारी संस्थांचा कारभार यशस्वीपणे पाहत आहोत. कुठलाही उद्योग उभा करताना ध्येयवेडे होवून प्रयत्न करा; तुम्हाला नक्की यश मिळते’’, असे दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘‘आपल्या व्यवसायाचे सखोल ज्ञान मिळवून वेळेचा नियोजनपूर्वक वापर करून, आत्मविश्‍वासाने सतत कार्यरत राहिल्यास यश मिळू शकते’’, असे मत के. बी. उद्योग समूहाचे शिल्पकार सचिन यादव यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी प्रास्ताविकात प्रसन्न रुद्रभटे यांनी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमच्या कार्याची माहिती देताना, ‘‘४५ हजार खेड्यांची माहिती गोळा करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगून, महाराष्ट्रातील प्रज्ञा, प्रतिभा आणि चांगुलपणाचे नेटवर्क निर्माण करून थिंक महाराष्ट्र लिंक महाराष्ट्र अशी संकल्पना असल्याचे सांगत फलटण तालुका संस्कृती महोत्सवाच्या नियोजनाची माहिती सांगितली’’. आभार जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी मानले.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, फलटण उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे दिनकर गांगल यांच्यासह फलटणमधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...

भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा

देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...

धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित

गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...

स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर

एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...