चिमणराव कदम यांच्यासारखा नेता तालुक्यात पुन्हा होणार नाही : ॲड.नरसिंह निकम
एकता दर्शन, फलटण : माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्तृत्वाची दखल महाराष्ट्राच्या इतिहासाला घ्यावीच लागेल त्याशिवाय राज्याचा सामाजिक व राजकीय इतिहास पूर्ण होणार नाही. चिमणराव कदमांसारखे आदर्शवत नेतृत्व पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील समाजोपयोगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचेकडे आजही पाहिले जात असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ विधीज्ञ नरसिंह निकम यांनी काढले.
स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या जयंतीनिमित्त येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ॲड.निकम बोलत होते. यावेळी शारदादेवी कदम, त्यांची सुकन्या, जावई, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, ॲड.एन.एम. यादव, तुकाराम गोळे, शिवाजीराव नाळे, विश्वासदादा सस्ते, रानडे इंजिनिअर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय कदम प्रशासनावर वचक असणारे, संकटकाळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावुन जाणारे नेते होते. राजकीय प्रक्रियेत असणाऱ्या युवकांना आचार-विचार, सुसंस्कार देणारा, मार्ग दाखविणारा एक आदर्शवत नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जात असून आजही त्यांचे विचार जिवंत असल्याचे जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून दिसत आहे. आजचे कार्यकर्ते रेडीमेड आहेत. पैसा फेको तमाशा देखो असे राजकारण चालले आहे. राजकारणाची दिशा बदलली आहे. सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे. स्वतंत्रपणे विचार मांडण्याची मुभा नाही. लोकशाहीतील संकेताचे उंल्लघन होताना दिसते आहे. स्वर्गीय कदम यांनी गरीब कार्यकर्ता उभा केला त्याला लढायला शिकवले. त्यांच्यासारखा अभ्यासू व आक्रमक नेता तालुक्यात पुन्हा होणार नसल्याची खंत ॲड.निकम यांनी व्यक्त केली.
शारदादेवी कदम म्हणाल्या, मी १९७२ चा दुष्काळ पहिला आहे. त्यावेळी साहेबांनी जनतेला खूप सहकार्य केले. गाव तिथे शाळा काढल्या. रस्ता, पाणी, आरोग्याच्या सुविधा दिल्या त्यामुळेच आजही सर्वसामान्य लोकं भेटत असल्याचे सांगत मी क्रांतिकारकाची मुलगी आहे मला अन्याय सहन होत नाही. आजही मी सर्वसामान्यांची कामे करते. काळ बदलला असला तरी दारू मटण देवुन तालुक्यात राजकारण करायचे नाही. महिलांचे संसार उध्वस्त करायचे नाहीत. साहेबांनी पाहिलेले साखर कारखाना निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याचे माझे प्रयत्न आजही सुरु आहेत, यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी ॲड.एन.एम. यादव, तुकाराम गायकवाड, तानाजी जगताप, गणपत चौधरी, संजय निंबाळकर, तुकाराम गोळे यांच्यासह अनेकांनी स्वर्गीय कदम यांच्या विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार क्षेत्रातील लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवरकर सर यांनी केले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
