पालखी सोहळ्यातील भाविकांची गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची सूचना
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात येण्यापूर्वी पालखी विसावा, मुक्काम, ठिकाणे व परिसरात पालखी सोहळ्यातील भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संबधीत शासकीय यंत्रणांनी घ्यावी यासाठी सातारा जिल्ह्यातील पालखी मुक्काम ठिकाणचे योग्य नियोजन झाले पाहिजे, अशा सूचना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबधीत यंत्रणांना दिल्या आहेत.
फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात आगमन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पालखी विसावा आणि मुक्काम ठिकाणची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आले होते. याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, फलटणचे प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
दत्त घाट, नीरा नदी, लोणंद, तरडगाव, फलटण, विडणी, पिंप्रद, बरड या ठिकाणांची वारकरी व भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा पाहणीदौरा पालकमंत्र्यांनी केला. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम असून, पालखी सोहळ्यात येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी यासह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिल्ह्यातील पालखीतळ व मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती, स्वच्छता, पालखीतळावर पुरेशी तात्पुरती शौचालये, शौचालयाच्या ठिकाणी पाणी, वीज आदी सुविधा करण्यात याव्यात. पिण्याच्या पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
पालखी सोहळ्यादरम्यान पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन पालखी सोहळा यशस्वी करावा, पालखी विसाव्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी रस्ता तयार करावा, पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणी विजेचे खांब, तारा यांची तपासणी करावी, वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी पुरेशी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देशही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला दिले.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
