पाण्यासाठी 'माळशिरस'मधील शेतकऱ्यांचा फलटणमध्ये मोर्चा
फलटण: नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील माळशिरस तालुक्यासह अन्य तालुक्यांना शेती पाण्याचा पुरवठा करणारा नीरा उजवा कालवा अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील पाटबंधारे विभागासमोर शेतकरीवर्गाचा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, मोर्चेकरांच्यावतीने पाणी पुरवठा विभाग प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
भर उन्हात मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाला २४ तासांच्या आत पाणी सोडा अन्यथा आम्ही इथून हलणार नाही असा इशारा दिल्यानंतर नीरा उजवा कालवा प्रशासनातील अधिकारी सभास्थळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात धावून आले. यावेळी उपस्थित शेतकरीवर्गाने प्रशासन अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांची खैरात करीत धारेवर धरले असता प्रशासन अधिकाऱ्यांनी नीरा उजवा कालवा फुटला असल्याने तो बंद करण्यात आला असल्याचे सांगितले. दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला थोडा कालावधी द्यावा अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली. मात्र, राजकीय हस्तक्षेपातून पाणी बंद केले असल्याचा आरोप शेतकरीवर्गाने यावेळी केला. अधिकारी व शेतकरीवर्गात झालेल्या तू-तू मै-मै मधील प्रकारानंतर कालवा दुरुस्तीसाठी ५ दिवसांची मुदत देण्याचा तोडगा निघाला.
याप्रसंगी साभस्थळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, माढा लोकसभा मतदार संघातील महाविकासघाडीचे उमेदवार धैर्यशील-मोहिते पाटील, उत्तमराव जानकार, बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

कालवा सल्लागार समितीला फोना-फोनी
धैर्यशील मोहिते-पाटील संबंधित अधिकाऱ्यांना पाणी कधी सोडणार असा प्रश्न विचारत होते, यावर अधिकाऱ्यांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मोहिते-पाटलांनी अधिकाऱ्यांना पंधरा मिनिटे विचार करण्याचा वेळ दिला. त्यानंतर संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयात जाऊन कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांना (अजितदादा, चंद्रकांत पाटील) फोना-फोनी करू लागले. यावर सल्लागार समितीच्या सदस्यांनी ३ दिवसात ऑनलाईन बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय करू असे सांगितल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक होत ऑनलाइन बैठक-बिठक काही नाही, तुम्ही कोणालाही फोन करा, पण आम्हाला पाणी सोडा असे म्हणाले.
नितीन गडकरी एका दिवसात ३० किलोमीटरचा रस्ता बांधतात : तुम्हाला कालव्याचे काम का होत नाही ?
तुमचे गडकरी एका दिवसात ३० किलोमीटरचा रस्ता बांधतात मग कालवा दुरुस्तीचे काम एका दिवसात का होत नाही ? तुमच्याकडे यंत्रणा नसेल तर तुमच्यापेक्षा जास्त पटीने काम करणारा ठेकेदार यंत्रणेसह आम्ही उपलब्ध करून देतो. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी डेड स्टॉक, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला लागणारे पाणी, पिण्याचे पाणी सोडून उर्वरित १.२५ टीएमसी पाणी शिल्लक असताना कालवा बंद का केला जात आहे ? १.२५ टीएमसी पाण्यावर अधिकारी का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित करत जर येणाऱ्या ५ दिवसात पाणी आले नाही तर पुन्हा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिला.
आमदार दीपक चव्हाणांची अधिकाऱ्यांना तंबी
तुम्हाला काय करायचे ते करा. उद्यापर्यंत कॅनॉल सुरू झाला पाहिजे. कोणतेही कारण सांगू नका. तात्पुरते काम करून रोटेशन पूर्ण करा. काम कधी चालू करणार ते आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, आशा चढ्या आवाजात आमदार दीपक चव्हाण यांनी माळशिरस तालुक्यातील निरा उजवा कालव्यातील बंद झालेल्या पाण्याबाबत अधिकाऱ्यांना तंबी दिली.
संयमी आमदार अचानक आक्रमक
गेल्या १५ वर्षांत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण सार्वजनिक ठिकाणी यापूर्वी कधीही चढ्या आवाजात बोलताना दिसले नाहीत. शांत व संयमी आमदार म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले जात होते परंतु माळशिरस तालुक्यातील बंद झालेल्या पाण्याच्या प्रश्नावर आमदार चव्हाण आक्रमक होताना दिसल्यानंतर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
