नरवीर जिवाजी महाले शूरतेचे प्रतीक
स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शूरवीर मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेच्या राज्याची स्थापना केली, यामध्ये नरवीर जीवा महाले यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. वीर जीवा महाले छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. अफजल खान भेटीदरम्यान अंगरक्षक म्हणून महाराजांचे केलेले रक्षण आजही आपल्या सर्वांसाठी शूरतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी केले.
नरवीर जिवाजी महाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील संत सावतामाळी मंदिरात आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापूराव काशीद, गोविंद भुजबळ, विडणी गावचे माजी सरपंच शरद कोल्हे, समता परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच वैभव नाळे, जाधवाडी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, सुभाष अभंग, सुभाष शिंदे, पत्रकार विकास शिंदे, विकास अहिवळे, कोळकीचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता नाळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काशीद, महेश पवार, अवि साळुंखे, संजय पवार, किशोर पवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी नरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब काशीद बापूराव काशीद यांनी जिवाजी महाले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक, व आभार अंबादास दळवी यांनी मानले. कार्यक्रमास विडणी, फरांदवाडी, ठाकूरकी, कोळकी, फलटण शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
