पालखी मार्ग कामाचे श्रेय संत ज्ञानेश्वरांचे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
एकता दर्शन, फलटण : महाराष्ट्र हि साधू संत शूरवीर महापुरुषांची पवित्र भूमी आहे. या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जाण्याची परंपरा अनेक वर्षांची आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, प्रवास सुखद व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून पंढरपूरकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णत्वाच्या अंतिम टप्यामध्ये आले आहेत. माझ्या हातून महाराष्ट्रात झालेल्या विकास कामांचे श्रेय हे माझे नसून संत ज्ञानेश्वर माऊलींचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोणंद फलटण या भागातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण संगणकीकरणाद्वारे येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या मैदानावर भव्य सभेत आयोजित केले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, अनुप शाह, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, केंद्र व राज्यातील बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यांच्यासह भाजपचे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरीची डिजिटल प्रत करणार :
ना. गडकरी म्हणाले, फलटणमध्ये येण्याची संधी मला मिळाली याचा आनंद होत आहे. या ऐतिहासिक शहरामध्ये येऊन आम जनतेला भेटायला मिळाले हे माझे मोठे भाग्य आहे. तालुक्यातील वारकऱ्यांनी माझे जे स्वागत केले आहे; त्यामुळे मी त्यांना नतमस्तक होवून वंदन करतो. विठोबा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या संतानी आपल्यावर प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत आपल्या मनामध्ये वेगळे स्थान आहे. तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरीची डिजिटल प्रत करायचे आम्ही ठरवले आहे.
शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे :
छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज आम्ही आहोत. राजा कसा असावा; तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा असावा. त्यांच्या स्पर्शाने पावन झालेली ही फलटणची भूमी आहे. मुंबई ते बेंगलोर व नागपूर ते बंगलोर हे महामार्ग फलटणमधून जात आहेत त्यामुळे या भागातील लोक फलटणमधून मुंबईला तीन तासात पोहचतील. या देशामधील शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे यासाठी राजकीय नेत्याने आपल्या सत्तेचा वापर विकासकांसाठीच केला पाहिजे अशी अपेक्षा ना. गडकरी यांनी व्यक्त केली.
खा. रणजितसिंह यांच्या सर्व मागण्या मंजूर :
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी या भागातील विविध कामांच्या केलेल्या मागण्या मी पूर्ण केल्या असून आज उपस्थित केलेल्या सर्व मागण्या मंजूर करत आहे. मी खोटे आश्वासन देत नाही. करू, बघतो, पाहतो हे शब्द माझ्या कार्यपद्धतीत नाहीत जे जमेल तेच मी करत असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.

फलटणच्या इतिहासातली भव्य सभा :
खासदार रणजितसिंह म्हणाले, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फलटणमध्ये एवढी मोठी भव्य सभा ही गडकरी साहेबांची होत आहे. मी खासदार झाल्यापासून ना. गडकरी यांनी या भागातील रस्ते विकास व अन्य कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि तीच कामे आज साकारताना दिसत आहेत.
पुन्हा फॉलोअपसाठी जावे लागत नाही :
एकदा शब्द दिला की, तो पूर्ण करण्याचे काम गडकरी साहेब करतात. त्यांच्याकडे एकदा कामासाठी गेल्यावर पुन्हा फॉलोअपसाठी जावे लागत नाही. राज्यातील वारकऱ्यांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या लक्षात आली होती. पालखी महामार्गाची फाईल पूर्वी प्रलंबित होती; त्यासाठी गडकरी साहेबांकडे गेलो, साहेबांनीही तातडीने सांगितले की खासदारजी फाईल पूर्ण होईल. फलटण शहरामधून जो पालखी मार्ग जात आहे; त्याचे सुद्धा प्रलंबित काम आपण करावे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
विकासकामांचा डोंगर उभा राहत आहे :
ज्या विमानतळावर आपण उतरलो त्या ठिकाणचा हवाईमार्ग दुरुस्त करावा. फलटण तालुक्यातील शेरेचेवाडी व सुरवडी येथे ओव्हर ब्रिज मंजूर करावा. पालखी महामार्गामुळे अर्धा रिंग रोड झाला आहे; त्याला पूर्ण करून संपूर्ण रिंग रोड करावा, अशी मागणी फलटणकरांसाठी करत असताना विकासकामांचा डोंगर उभा राहत असून आम्हाला तो डोळ्यांनी बघायला मिळणार आहे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
पवार साहेबांप्रमानेच मंत्री गडकरींचे काम :
आमदार रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपले प्रथमच आगमन झाले असेल. प्रमोद महाजन हे फलटणमध्ये येऊन गेल्याचे आठवते. शहाजी बापू माझी भीती तुम्हाला वाटते हेच एकदम ओके आहे. आपण मूळ कोणत्या पक्षाचे आहोत, आपण आधी अपक्ष आहोत, मग काँगेस, मग मी पुढं काही सांगणार नाही... असा विनोद करत गडकरी साहेब मला ह्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल आभार. ९५ साली जेव्हा मी माझे काम घेऊन गडकरी साहेबांकडे गेलो होतो; तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आता माझ्याकडे फॉलोअपसाठी येणाची आवश्यकता नाही. आज सुद्धा दिल्लीमध्ये आपण गेलो तरी गडकरी साहेब ते काम मार्गी लावतात. फलटण तालुक्यातून ग्रीन हायवे चालला आहे; तो अतिशय गरजेच्या वेळी तुम्ही करत आहात. सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीची बैठक आपण कुठेही घ्यावी, त्या बैठकीला आम्ही येऊ असे सांगत नितीन गडकरी जे काम करीत आहेत ते पाहिल्यानंतर मला शरद पवार साहेबांची आठवण येते. पवार साहेब जेव्हा ज्या प्रमाणे दिल्ली येथे मंत्री म्हणून काम करत होते त्याच प्रमाणे नितीन गडकरी हे काम करीत असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्राला जिव्हाळा वाटावा असा कार्यक्रम :
आमदार शहाजी बापू म्हणाले, संपूर्ण सातारा जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला जिव्हाळा वाटावा असा कार्यक्रम फलटणमध्ये होत आहे. या जिल्ह्याचे महत्व इतिहासात असून फलटणचे सुद्धा महत्व इतिहासात आहे. शिवाजी महाराजांचे सासर, संभाजी महाराजांचे आजोळ हे फलटणच असल्याचा दाखल देत गडकरी यांचे विकासाचे काम मोठे असून त्यांच्यामुळेच भारतमाता मजबूत होत आहे. राज्यातील सर्व वारकऱ्यांचा मोठा प्रश्न सोडवला आहे. राजा जसा राजवड्याकडे जातो त्याचप्रमाणे वारकरी गडकरी साहेबांनी तयार केलेल्या पालखी मार्गावरून पंढरीकडे जाणार आहे. फलटण शहरातील पालखी मार्ग सुद्धा मार्गी लावावा. आळंदी-पंढरपूर मार्ग, व संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग (देहू-पंढरपूर) हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावेत. हे राष्ट्रीय महामार्ग झाल्यास महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचा मोठा प्रश्न निकाली निघणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्पष्ट केले.
ना. गडकरींची सवाद्य मिरवणूक :
फलटण येथील विमानतळावर ना. नितीन गडकरी यांचे आगमन झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर त्यांची सवाद्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली.
वारकरी संघटनेच्यावतीने विशेष सत्कार :
प्रारंभी ना. गडकरी यांचे स्वागत व विशेष सत्कार फलटण तालुका वारकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित खासदार आमदार स्थानिक भाजप नेते व पदाधिकारी यांचा सत्कार बांधकाम प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थिती होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
