विकासकामे करण्यात कमी पडणार नाही
फलटण : फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला दिलेल्या सर्व शब्दांची कामे करून पूर्तता केली असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला भाजपने पुन्हा उमेदवारी देऊन विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असून यापुढे विकासकामात बिलकुल कमी पडणार नसल्याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली
फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) उद्घाटन समारंभात खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, उत्तमराव जानकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, आरटीओ कार्यालयातील अधिकारी चव्हाण, म्हेत्रे, नगरपालिका मुख्याधिकारी कोंडे पाटील यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सामान्य जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची वचनपूर्ती आपल्या पाठिंबामुळे विशेषतः जयकुमार गोरे यांच्यामुळे केली. तालुक्यातील अनेक मोठी कामे मार्गी लागली. निरा देवघर उजवा कालवा, धोम बलकवडी बारमाही, फलटण-बारामती व फलटण-पंढरपूर रेल्वे, मतदार संघातील विविध रस्ते, एमआयडीसी या कामात यश आले. आज आरटीओ कार्यालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू झाले असून अतिरिक्त तहसील, अतिरिक्त जिल्हा पोलीस कार्यालयही काही दिवसात होणार आहे. विकासकामात मी कमी पडलो नाही. भाजपने मला पुन्हा मैदानात उतरण्याची संधी दिली असल्याचे सांगत या संधीसाठी मला सहकार्य करा आणि पुन्हा विकासाची जास्तीची कामे करण्यासाठी मला संसदेत पाठवा असे आवाहन खासदार रणजितसिंह यांनी यावेळी केले.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, फलटण व माण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे खासदारांकडून दोन्ही तालुक्यात विकासकामात दुजाभाव केला जात नाही. गेल्या ३० वर्षात फलटण-माणमध्ये जे झाले नाही ते आम्ही दोघांनी केले आहे. विकास काय असतो हे भाजप सरकारने दाखवून दिले आहे. विकासप्रक्रिया यापुढे अशीच वेगाने चालविण्यासाठी भाजपने पुन्हा खासदारांना उमेदवारी दिली आहे. योग्य माणूस दिल्यानंतर काय घडते हे सर्वांनी पाहिले असून आगामी काळात या भागात आश्चर्यकारक बदल होणार होणार आहेत.
प्रारंभी आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन खासदार नाईक-निंबाळकर, आमदार गोरे यांच्याहस्ते झाल्यानंतर संपूर्ण कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. प्रशासन अधिकारी यांच्या कार्य तत्परतेबद्दल अधिकार्यांचा सत्कार केला. यावेळी फलटण न्यायालयातील ३५ वकिलांची नोटरी पदावर निवड झाल्यामुळे त्या सर्व वकिलांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक चव्हाण यांनी केले. आभार म्हेत्रे यांनी मानले. कार्यक्रमास बोरावके हिरोच्या प्रमुख सौ.रुपाली बोरावके, अरिहंत ऑटोमोबाईलचे प्रमुख मंगेशशेठ दोशी, धनंजय साळुंखे-पाटील, सुधीर ढेंबरे, अमोल सस्ते, बजरंग गावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आरटीओ एजंट, वकील, डॉक्टर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
