बार्टीच्या संविधान दिंडीचे फलटणमध्ये होणार आगमन
एकता दर्शन : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या नैतिक मूल्यांची माहिती पालखी सोहळ्यात जण-सामान्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने संविधान दिंडीचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात संविधान दिंडी सहभागी झाली असून आज दि.२१ रोजी फलटण येथे संविधान दिंडीचे आगमन होणार आहे.
महाराष्ट्राला भागवत व भक्ती संप्रदायाची मोठी परंपरा असून संत विचारांचा मोठा वारसा आहे. प्रतिवर्षी आळंदी ते पंढरपूर पर्यंत लाखो वारकरी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. या सोहळ्यातील सहभागी समाज बांधवांच्यात संविधानातील मूलभूत तत्वांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वारी हे प्रभावी माध्यम असल्याने बार्टीच्या वतीने संविधान दिंडी काढण्यात येत असते.
संविधान दिंडी संकल्पनेत समता रथ, जण-जागृती विषयक कार्यक्रम, प्रचार व प्रसाराची प्रचलित साधन सामग्री, संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती, ऑडिओ-व्हिडीओ प्रसार माध्यमांचा वापर आदी साधनांचा समावेश संविधान दिंडी संकल्पनेत करण्यात आला आहे.

संविधान दिंडी आज दि.२१ रोजी माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबरच फलटण शहरात प्रवेश करणार असून येथील पालखी तळावर या दिंडीचे विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत सादर केले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना माऊली भक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन बार्टीचे विस्तार व सेवा विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले आहे.
संविधान दिंडीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, समतादूत कर्मचारी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी आदी सहभागी झाले आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
