फलटण रेल्वे स्थानकाचा 'अमृत भारत स्थानक' योजनेत समावेश
एकता दर्शन: देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी भारतीय रेल्वे विभागाने 'अमृत भारत स्थानक' नावाची योजना सुरू केली असून या योजनेत फलटण रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. या कामाच्या पाठपुराव्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नाला भारतीय रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी १२७५ रेल्वे स्थानके सदर योजनेत निश्चित केली असून यात पुणे विभागातील फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्यात आला असल्याचे संबंधित विभागाचे अधिकृत पत्र देण्यात आले आहे.
अमृत भारत स्थानक योजनेत रेल्वे स्थानकांचा शाश्वत विकास करण्याची कल्पना आहे. यामध्ये प्रवेशद्वार, परिभ्रमण क्षेत्र, प्रतीक्षागृह, विश्रांतीगृह, लिफ्ट, स्वच्छतागृह, मोफत वायफाय, स्थानकावरील गरज लक्षात घेऊन 'एक स्थानक एक उत्पादन' सारख्या योजनेद्वारे स्थानिक उत्पादनासाठी कियॉस्कचा समावेश, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यावसायिक बैठक व्यवस्था आदी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव
शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, दिव्यांगासाठीच्या सुविधा, शाश्वत पर्यावरण पूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅक तरतूद, रुफ प्लाझा (आवश्यकतेनुसार), रेल्वे स्थानकावर दीर्घकालीन सिटी सेंटर बांधणे, इमारतींमधील सुधारणा यासारख्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली असून पैकी पहिल्या टप्प्यासाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
फलटण रेल्वे प्रत्यक्ष कार्यान्वित करून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
