'के.बी. कल्चर-२०२२' दांडिया स्पर्धा जल्लोषात
फलटण (एकता दर्शन) : के.बी. कंपनीने नवरात्र उत्सव दरम्यान आयोजित केलेल्या "के.बी. कल्चर-२२" अंतर्गत दांडिया स्पर्धेमध्ये जय तुळजाभवानी ग्रुपने प्रथम क्रमांक, नृत्य कलाग्रुपने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक शिवशंभुग्रुने मिळवला आहे.
विजेत्या प्रथम क्रमांकाच्या ग्रुपला ११,१११ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या ग्रुपला ७,७७७ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाच्या शिवशंभु ग्रुपला ५,५५५ रुपये व सन्मानचिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे कंपनीचे संचालक सचिन यादव आणि गॅलक्सी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव यांच्या हस्ते समारंभपुर्वक देण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.

या दांडिया स्पर्धेचा शुभारंभ कंपनीचे संचालक सचिन यादव आणि सौ. सुजाता यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आला. स्पर्धकांच्या पारंपरिक वेषभूशा, कंपनी मार्फत देण्यात आलेल्या सुविधा, स्पर्धांचे योग्य नियोजन, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्कृष्ठ गरबा नृत्य आदी वैशिष्ट्ये या स्पर्धेची प्रमुख आकर्षणं ठरली होती. एकूणच डोळ्याचे पारणे फेडणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पहिले जात होते. यावेळी उत्साही वातावरणातील उकृष्ठ स्पर्धकांच्या सादरीकरणास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धकांकडून कंपनीचे कौतुक
या देखण्या कार्यक्रमात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सहभागी स्पर्धकांना 'तुम्हाला कंपनीत सर्वात जास्त काय आवडले'? असा सूत्रसंचालकाने प्रश्न उपस्थित केला असता यावर स्पर्धक उत्तर देत म्हणाले कि या आम्हाला या कंपनीचे कल्चर आवडले असून आमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जॉबसाठी आम्ही या कंपनीला प्रथम पसंती देऊ.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
