ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

फलटण तालुक्यातील २४ पैकी २० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या विजयाची पताका

Share This Article:
फलटण तालुक्यातील २४ पैकी २० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या विजयाची पताका

एकता दर्शन (फलटण) : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक मतदानपूर्व ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित २० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकूण २४ पैकी २० ग्रामपंचायतींवर आपल्या विजयाची मोहर उमटवुन वर्चस्व सिद्ध केले आहे. उर्वरित ४ पैकी भाजपने २ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला, तर सुरवडी आणि गिरवीचे होमपिच अनुक्रमे प्रल्हादराव साळुंखे-पाटील व सह्याद्री कदम यांनी राखले. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विडणी ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार सागर अभंग निवडून आल्याने अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक सत्तेला भाजपने सुरूंग लावला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या स्थानिक नेतृत्वाखाली "गड आला, पण सिंह गेला" अशी अवस्था झाली आहे. १७ पैकी १३ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि ४ सदस्य व सरपंच असे भाजपाचे बळ या ग्रामपंचायतीत बघायला मिळणार आहे. 

सुरवडी ग्रामपंचायतीची सत्ता गेली २५-३० वर्षे प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती. यावेळीही त्यांनी पुन्हा या ग्रामपंचायतीवर विजय मिळविल्याने विजयाची परंपरा कायम राखली आहे. प्रल्हादराव पाटील यांच्या सुनबाई सौ. शरयू जितेंद्र साळुंखे-पाटील यांनी सरपंचपदावर बाजी मारली आहे. निवडणूक प्रचार दरम्यान प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी केलेली भिष्म प्रतिज्ञा अखेर या विजयाने सत्यात उतरवली. या ग्रामपंचायतीमध्ये गेली अनेक वर्षे विरोधकांना फिरकू दिले नसल्याचे पाटील यांनी पुन्हा एखदा या निकालाने सिद्ध केल्याने आगामी राजकारणातील आपले राजकीय वजन विरोधकांना विचार करायला लावणारे ठरले आहे.

गिरवी ग्रामपंचायतीवर सह्याद्री चिमणराव कदम गटाने विजय मिळवून आपले राजकीय होमपीच भक्कम केल्याचे स्पष्ट झाले आहे. गिरवीच्या राजकारणातील कदम गट गेली काही वर्षे मागे असल्याचे चित्र होते, मात्र या विजयामुळे पुन्हा एकदा सह्याद्रीभैय्या कदम गटाला राजकीय उर्जितावस्था येणार असल्याचे या निवडणूक निकालाने अधोरेखीत केले आहे.

दुधेबावी ग्रामपंचायतीवर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ.  भावना सोनवलकर या सध्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या असून त्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी उभ्या होत्या. त्या या निवडणुकीत विजयी झाल्या असल्या तरी त्यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी झगडावे लागल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे.

पिंपरद ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने पुन्हा आपली सत्ता कायम राखत विजय खेचुन आणलाआहे. फलटण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाने मतदारांचा कौल राष्ट्रवादीकडे कायम असल्याचे अधोरेखीत केले असून २० ग्रामपंचायतींवर विजयाची पताका फडकविली आहे. भाजपने २ ठिकाणी तर पाटील व कदम गटाने प्रत्येकी एक ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे.

गाव निहाय विजयी सरपंचांची नावे :

वडले : संतोष दिनकर लाळगे, विडणी : सागर अभंग, दुधेबावी : सौ. भावना माणिकराव सोनवलकर, गिरवी : धनश्री कदम, आदर्की बु : गणपतराव धुमाळ, आदर्की खुर्द : नीलम निंबाळकर, सालपे : दादासो कोळपे, पाडेगाव : राहुल कोकरे, मठाचीवाडी : जयश्री भोसले, बरड : प्रकाश लगुंटे, सुरवडी : सौ. शरयू साळुंखे-पाटील, चव्हाणवाडी : चंद्रभागा गोरे, कुसूर : ज्योती नरूटे, सोमंथळी : किरण सोडमिसे, पिंपरद : स्वाती भगत, चौधरवाडी : तुकाराम कोकाटे, वाठार निंबाळकर : सुवर्णा नाळे, ताथवडा : दशरथ शिंदे, कुरवली खुर्द : राहुल तोडकर, तरडफ : रंजना गोडसे

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...